कर्जत नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक
कर्जत | वीरभूमी- 02-Dec, 2021, 06:09 PM
कर्जत नगरपंचायतीसाठी दुसऱ्या दिवशी देखील एक ही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस देखील निरंकच ठरला.
पुढील तीन दिवस १७ प्रभागासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवाराची मोठी झुंबड पहावयास मिळणार आहे. मंगळवार, दि ७ डिसेंबरअखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत आहे.
कर्जत नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कालपासून १७ प्रभागासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत नगरपंचायतीच्या कार्यलयात सुरू आहे.
दि १ आणि २ रोजी एक ही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती डॉ अजित थोरबोले यांनी दिली. शनिवार आणि रविवारी शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस बाकी असून या तीन दिवसात इच्छुक उमेदवारांची मोठी झुंबड पहावयास मिळणार आहे. कर्जत नगरपंचायतीच्या एकूण १७ प्रभागासाठी आठ टेबलवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल.
यासाठी महसुल प्रशासनास नगरपंचायत कर्मचारी सहकार्य करीत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ थोरबोले यांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार नानासाहेब आगळे आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव हे काम पाहत आहे.
Comments