अहमदनगर । वीरभूमी- 05-Dec, 2021, 02:19 PM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आज रविवारी निचांकीस्तरावर आल्याने समाधान व्यक्त होत आहे. आज रविवारी जिल्ह्यात एकुण 37 कोरोना बाधित आढळले.
दिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा घटत चालला आहे. आज प्रथमच अहमदनगर जिल्ह्यातील आकडा 37 वर आला आहे. यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
कोरोना बाधितांचा आकडा घटत असला तरी नव्याने आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे काळजी घेण्याची गरज आहे. राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असला तरी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 20, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 15 तर अँटीजेन चाचणीत 2 असे 37 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 7, शेवगाव 5, राहाता 4, श्रीगोंदा 4, कर्जत 3, इतर जिल्हा 3, नगर शहर 2, जामखेड 2, नगर ग्रामीण 2, नेवासा 2, कोपरगाव 1, पाथर्डी 1, राहुरी 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर अकोले, भिंगार, मिलटरी हॉस्पिटल, इतर राज्य, पारनेर, श्रीरामपूर येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी घटत चालली असली तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
VCGhubtwiAQNqdX