कोपरगाव । वीरभूमी - 10-Dec, 2021, 01:12 PM
तालुक्यातील गोधेगाव ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीत कोल्हे गटाच्या जयश्री दिनेश शिरसाठ यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर दहेगाव बोलका ग्रामपंचायतीत काळे गटाच्या अरुणकाका वलटे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने कोल्हे गटाचे निलेश त्र्यंबकराव सरोदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
खिर्डीगणेश ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत कोल्हे गटाच्या उमेदवार अनिता अनिल चांदर यांनी माघार घेतल्याने परजणे गटाच्या वैशाली नित्यानंद चांदर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विजयी उमेदवारांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे आदींनी अभिनंदन केले आहे.
या निवडणुका बिनविरोध करणे कामी दहेगांव बोलका येथील सर्वश्री त्रंबकराव सरोदे, भास्करराव वल्टे, विलासराव कुलकर्णी, लक्ष्मणराव वल्टे, डॉ. गुलाबराव वरकड, अनिलराव वल्टे, रविनाना देशमुख, विकास कुलकर्णी, अरुणकाका वल्टे, बाळासाहेब देशमुख, संतोष देशमुख यांनी परिश्रम घेतले.
गोधेगावात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माधवराव रांधवणे, जनार्दन शिंदे, प्रकाश शिंदे, वाल्मीक भोकरे, सयाराम कोळसे, भाऊसाहेब भाकरे, अशोक भाकरे, नंदु रांधवणे, सतिष कानडे, बारकुनाना रांधवणे, अशोकराव पठाडे, सुभाष कानडे, बबनराव साळुंके, सुभाष शिरसाठ, कैलास साळुंके, बाळासाहेब साळुंके
तर खिर्डीगणेश येथे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बाबुराव चंदर, प्रदिपराव नवले, वाल्मीकराव भास्कर, साईनाथ खिरडकर, रमेश भास्कर, चंद्रभान रोहोम, चंद्रकांत चांदर, अविनाश चांदर, निलेश वराडे, जनार्दन रोहोम, सचिन सुरासे, ज्ञानेश्वर गायकवाड, नित्यानंद चांदर आदिनी विशेष परिश्रम घेतले.
Comments