उद्धव देशमुख । वीरभूमी - 15-Dec, 2021, 02:58 PM
बोधेगाव : भगवानगड परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांना या प्रश्नाला हाल अपेष्टा सहन करत सामोरे जावे लगत होते. परिसरातील नागरीकांच्या घशाची कोरड कमी करण्यासाठी शासन दरबारी पाथर्डीतील ४३ तर शेवगावातील ३ गावांचा समावेश करुन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली.
या योजनेला अंतीम रुप देण्याआगोदर या परिसरातील ऊसतोडणी कामगारांच्या गावांचा समावेश करावा. या प्रमुख मागणीसाठी शेवगांव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेउन त्यांना निवेदन दिले.
गेल्या १० वर्षापासून प्रलंबित असलेल्या भगवानगड व ४६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी युती शासनाच्या कालावधीत कुठलाही निधी टाकण्यात न आल्याने ही योजना आहे. तशीच मंजुरीच्या प्रतिक्षेत रेंगाळत राहिली.
पाणी हे जीवन आहे. हा संदेश समोर ठेवून सर्वसामन्यांच्या हिताखातर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घुले बंधु आणि प्रदेश सरचिटणीस ॲड. ढाकणे यांनी या योजनेसाठी विशेष प्रयत्न केले.
आज बुधवार दि. १५ रोजी मंत्रालयात झालेल्या भगवानगड पाणीपुरवठा योजनेच्या बैठकीत सकारात्मक चर्चा घडून आली. येत्या काही कालावधीत या योजनेला मुर्त रुप मिळत असताना उर्वरित ऊस तोडणी कामगारांच्या गावांचा देखील या योजनेत समावेश करावा. या आशयाचे निवेदन शेवगांव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील याना दिले.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्विकास मंत्री प्राजक्तदादा तनपुरे, जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे सह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अशी आहे भगवानगड पणीपुरवठा योजना :
स्थान- जायकवाडी फुगवटा उद्भव ते भगवानगड.
अंतर- 415 किमी
रक्कम- 190 कोटी (अंदाजित खर्च)
पाथर्डीतील गावे - 43,
शेवगावातील गावे - 3
लोकसंख्या- 76 हजार (अंदाजित)
पालकमंत्री यांची आराखड्यास मंजुरी- 16 फेब्रूवारी 2021
मंत्रालयात सकारात्मक बैठक संपन्न- 15 डिसेंबर 2021
ipKfukoW