उद्धव देशमुख । वीरभूमी - 23-Dec, 2021, 10:35 AM
बोधेगाव : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास योजनेअंतर्गत अंगणवाडीतील बालकांच्या शारीरीक विकासासाठी सकस आहाराचे नियोजन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावापासुन आहार शिजवण्याच्या पध्दतीत बदल करून तो तीन महिण्याच्या टप्प्याने लाभार्थीना वाटप करण्यात येत आहे.
या नियोजनात सकस आहाराच्या नावाखाली काही धान्य मात्र निकृष्ट दर्जाचे देण्यात येत असल्याचे बोधेगाव (ता. शेवगाव) येथील अंगणवाडीत पहायला मिळत आहे. याकडे ग्रामीणसह तालुका पातळी वरील अधिकार्यांचे मात्र दुर्लक्ष पहायला मिळत आहे.
बालकांचा शारीरीक विकास व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बालविकास प्रकल्पांतर्गत सकस आहाराचे नियोजन केले जाते. वय, वजन, उंची, बौद्धिक क्षमता या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देउन बालकांना दररोज वेगेवेगळ्या पध्दतीचा आहार शिजवून देण्यात येतो.
परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून मात्र अंगणवाडीचा आहार तीन महिण्याच्या टप्प्याने लाभधारक बालकापर्यंत पोहचविण्याचे काम केले जात आहे. या आहारात गहु, साखर, मिठ, तिखट, जिरे, हरबरा, मुगदाळ अशा सात वेगवेगळ्या घटकांचा समावेश यात होतो. परंतु यात मुगडाळीचा प्रकार हा अत्यांत निकृष्ट दर्जाचा असुन त्यात खडे आणि कस नसलेली बारीक दाळ पुड्यामध्ये पहायला मिळते.
बालकांच्या आहारात याचा कसा वापर करावा हा मोठा यक्षप्रश्न पालकांना पडला आहे. याचे वितरण गेल्या दहा ते बारा महिण्यापासुन सुरु आसुन यात अंगणवाडी चालक तसेच तालुका पातळीवरील अधिकारी फक्त बघ्याची भूमिका पार पाडताना दिसत आहेत.
अंगणवाडीतील आहार हा बालकांच्या पोषणासाठी देण्यात येत असताना, निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे बालकांचा शारीरीक विकास धोक्यात येणार आहे. त्यामुळे सकस आहार मिळुन देण्यासाठी आधिकार्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- नितीन घोरतळे, संचालक, सेवा सोसायटी, बोधेगाव
अंगणवाडीतील निकृष्ट दर्जाचा आहार साहित्याचा स्पॉट पंचनामा करून मूगदाळीचा दर्जा पहाण्यासाठी त्याचे नमुने लॅबला पाठवावे लगतील.
- भाऊ गडधे, सिडिपिओ, पंचायत समिती शेवगाव
KCGRrDkiEw