कोपरगाव । वीरभूमी - 30-Dec, 2021, 05:48 PM
कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या व्यक्तींना कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तरी कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रावर जावून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार विजय बोरुडे यांनी केले आहे.
कोपरगाव शहरात व तालुक्यातील इतर भागात प्रवेश किंवा फिरण्यासाठी किमान एक डोस घेतला असला पाहिजे. तसेच प्रशासन लस घेतलेले प्रमाणपत्र तपासणी करणार असल्याने नागरिकांची कुचंबणा होऊ नये व पुढील अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी लस घेणे आवश्यक आहे.
तालुक्यातील सर्व आस्थापना यांनी आपण आपले व आपल्याकडे कार्यरत कर्मचारी यांचे प्रमाणपत्र 9013151515 या व्हाटस्अॅप क्रमांकावरुन वरून डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांचे दोन्ही डोस झाले आहेत असेच कर्मचारी आपल्या दुकानात काम करत असावेत. त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र आपल्याकडे बाळगणे गरजेचे आहे. तसेच ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहे, त्यांनाच दुकाने किंवा इतर आस्थापनामध्ये प्रवेश करता येणार आहे. अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करावे. अन्यथा दुकान सिल बंद करण्याची कडक कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार यांचे आदेश आहेत.
उद्या 31/12/2021 रोजी पुढील ठिकाणी लस उपलब्ध असणार आहे. (कंसात डोसची संख्या)- कोपरगाव ग्रामीण (कोविशिल्ड)- सुरेगाव (100), कोळपेवाडी (100), चासनळी (200), सांगावी भुसार (100), वेळापूर (100), धामोरी (100), दहिगांव बोलका (200), खिर्डी गणेश (100), पोहेगाव (200), सोनेवाडी (100), सवंत्सर (200), शिंगणापूर (100), टाकळी (200), वारी (200), धोत्रा (100), सडे (100).
याचप्रमाणे- कोपरगाव शहर (कोविशिल्ड व कोव्हॅक्शीन)- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव नगरपालिका (500 डोस), सर्व मस्जिद कोपरगाव शहर, कोपरगाव ग्रामीण रुग्णालय (500 डोस) उपलब्ध आहेत.
तरी पात्र नागरिकांनी आपले आधार कार्ड व मोबाईल घेऊन कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी वरील ठिकाणी हजर राहावे, असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
mgXuYJDPyzs