शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल । चोरीच्या घटनांमध्ये वाढ
शेवगाव । वीरभूमी - 03-Jan, 2022, 09:18 PM
शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके बाहेर गावी गेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून दागीने लंपास केले. ही चोरीची घटना रविवारी (दि. 2) रोजी दुपारी गटविकास अधिकारी महेश डोके हे घरी आले असता ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
गटविकास अधिकारी डोके हे शहरातील शुभम मंगल कार्यालयाशेजारी कुटूंबियांसमवेत राहतात. कामानिमीत्त ते कुटूंबासह त्यांच्या मुळगावी भुतवडा (ता. जामखेड) येथे दि. 28 डिसेंबर रोजी घर बंद करुन गेले होते. रविवार (दि. 2) रोजी ते दुपारी चारच्या सुमारास घरी आले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.
त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला असता तेथील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील बाँक्समध्ये ठेवलेले चार ग्रॅम वजनाचे 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण त्यांना आढळून आले नाही. घरात इतरही वस्तुंची उचकापाचक केल्याचे दिसून आले.
याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात येवून अज्ञात चोरटयांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील व शहरातील नागरीक चोरीच्या घटनांनी नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. त्यातच चोर्यांचा तपास लागण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. असे असताना चोरट्यांनी अधिकार्यांच्या घरास लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे.
cLWmlFejkEMurVTy