शेवगाव / प्रतिनिधी - 03-Jan, 2022, 10:04 PM
तालुक्यातील ठाकुर निमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये परीवर्तन शेतकरी मंडळाने सर्व 13 पैकी 13 जागेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधी जनसेवा शेतकरी मंडळाचा पराभव केला आहे.
तालुक्यातील ठाकुर निमगाव सेवा संस्थेच्या 13 जागांसाठी रविवार (दि.2) रोजी मतदान झाले. त्यात 453 मतदारांपैकी 430 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर रात्री शहरातील मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालयामध्ये मतमोजणी झाली. त्यात परीवर्तन शेतकरी मंडळाचे सर्व 13 उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.
परीवर्तन शेतकरी मंडळाचे नेतृत्व संभाजी कातकडे, लक्ष्मण मडके, मच्छिंद्र कातकडे, परमेश्वर निजवे, साईनाथ कातकडे, आबासाहेब कातकडे आदींनी तर विरोधी जनसेवा शेतकरी मंडळाचे नेतृत्व बाजार समितीचे माजी सभापती व माजी सरपंच गहिनीनाथ कातकडे, सखाराम घावटे, आत्माराम निजवे यांनी केले.
ठाकुर निमगाव सेवा संस्थेत अनेक वर्ष सत्तेत असलेल्या जनसेवा शेतकरी मंडळाचा मोठ्या फरकाने पराभव झाला. 30 वर्षानंतर सोसायटीची सत्ता सुज्ञ मतदार व गावकर्यांनी तरुणांच्या हातात दिली आहे.
या निकालानंतर परिवर्तन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. यु. लकवाल यांनी काम पाहीले.
परिवर्तन शेतकरी ग्रामविकास पॅनलला दादासाहेब शिंदे, मच्छिंद्र कातकडे, महादेव कातकडे, साईनाथ कातकडे, महादेव निजवे, विष्णु फरताळे, हरिदास निजवे, विट्ठल निजवे, सखाराम कसबे, मोहन कातकडे, आत्माराम कातकडे सर, रावसाहेब शिंदे, भगवान घोरपडे, रामेश्वर निजवे, पांडुरंग निजवे फिटर, भीमराव बळीद, सतीश महाराज फरताळे,
माणिकराव खेडकर, भागीनाथ खेडकर, आसाराम खोलशे, भास्कर कातकडे, जनार्धन निजवे, हरिभाऊ हुंबे, शेषेराव कातकडे, गहिनीनाथ शिंदे, गफूरभाई पठाण, ज्ञानदेव कातकडे, सुखदेव भगत, भगवान घावटे, श्रीकिशन घनवट, जयचंद घनवट, भारत घनवट, रामनाथ निजवे, नामदेव कातकडे, रमेश दळे, नागनाथ निजवे, आनंदा बळीद, लिंबाजी निजवे, जगन्नाथ निजवे, भाऊसाहेब कर्डीले, ज्ञानदेव कातकडे, आपासाहेब निजवे, रोहिदास कातकडे, लक्ष्मण दादा निजवे, जनार्धन कातकडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
ठाकुर निमगाव सेवा संस्थेच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते : जिजाभाऊ निजवे (231), पंढरीनाथ कातकडे (230), साईनाथ निजवे (230), मच्छिंद्र निजवे (229), दादासाहेब निजवे (225), रामनाथ फरताळे (225), ज्ञानेदव कातकडे (223), शंकर हुंबे ( 219), बाळासाहेब बळीद (237), अलका निजवे (249), यशोदा कातकडे (242), दिलीप घनवट (230), अशोक खोलासे (238) अशी आहेत.
Comments