अनाथांची माय हरपली
पुणे । वीरभूमी- 04-Jan, 2022, 10:39 PM
अनाथांची माय असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ (वय 75 वर्षे) यांचे आज पुणे येथे उपचार सुरु असतांना निधन झाले. त्यांच्यावर गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये हर्नियावर उपचार सुरू होते.
सिंधूताई सपकाळ या मागील काही दिवसापासून पुणे येथील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये हर्निया आजारावर उपचार होते. मात्र आज मंगळवारी रात्री 8.15 वाजेच्या दरम्यान उपचार सुरू असतांना निधन झाले.
त्यांच्यावर उद्या सकाळी शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. वयाच्या 75 व्या वर्षीही त्या अनाथांसाठी झटत होत्या.
अनाथांसाठी त्यांनी मोठे काम केले. त्यांनी उभे आयुष्य एक माय (आई) म्हणुन अनाथांचा सांभाळ केला. अनेकांना मुलांप्रमाणे प्रेम करून अनेकांचे संसार उभे केले.
2012 साली त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला होता. तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
BqsCTndjRVc