राज्यात सोमवारपासून कठोर निर्बंध लागू
दिवसभर जमाबंदी तर रात्री संचारबंदी । काय सुरू, काय बंद वाचा
मुंबई । वीरभूमी- 08-Jan, 2022, 11:09 PM
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्य सरकारने नव्याने कठोर निर्बंध जाहीर केले आहेत. यानुसार उद्यापासून राज्यातील शाळा व महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार आहेत. त्याप्रमाणे रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी तर दिवसभर जमावबंदी असणार आहे. तसेच स्विमिंग पूल, जीम, स्पा पूर्णपणे बंद राहणार आहे.खाजगी आस्थापणा, सलून, हॉटेल्स, नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने चालवता येणार आहेत. तर विवाह सोहळ्यासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 जणांना परवानगी देण्यात आली आहे.
कठोर निर्बंध जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा संदेश दिला आहे. कोरोनाचे दूत होऊन इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका. आपल्याला कोणाचीही रोजीरोटी बंद करायची नाहीत. मात्र आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जी करू नका. तुम्ही स्वतःचे आरोग्य चांगल ठेवाल पण इतरांचे आरोग्य धोक्यात येईल असे वर्तन करू नका, असे आवाहन करत नियम मोडणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
राज्यात वाढणार्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री राज्य सरकारकडून नवे निर्बंध जाहीर करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रात सोमवारी मध्यरात्रीपासून (सोमवार सकाळपासून) रात्रीची संचारबंदी तर दिवसभर जमाबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसेल. तसेच दिवसभर जमावबंदीही लागू असेल. त्यामुळे पाचपेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही.
तर जिम, स्पा आणि स्विमींग पूलही पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तर खासगी कार्यालये, हॉटेल्स, नाट्यगृह, थिएटर्स आणि सलून्स 50 टक्के क्षमतेने चालवता येणार आहेत. तर मॉल्स सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेतच सुरु ठेवता येतील. तर मैदाने, उद्याने आणि पर्यटनस्थळेही पूर्णपणे बंद राहणार आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनवर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये म्हटले आहे की, पहाटे पाच ते रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी लागू असेल. अत्यावश्यक कारणांशिवाय रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. सरकारी कार्यालयांमध्ये व्हिजिटर्सना परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही. लोकल ट्रेनवर कोणतेही निर्बंध नाहीत. सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती बंधनकारक आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचार्यांनाच कार्यालयात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. विवाह सोहळ्याला फक्त 50 जणांना उपस्थित राहता येणार आहे. तर अंत्यविधीला 20 जणांना उपस्थित राहता येणार आहे.
राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी 50 जणांच्या उपस्थितीची अट घालण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. स्विमींग पूल्स, स्पा, जिम, वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून्स पूर्णपणे बंद राहणार आहे. केशकर्तनालय (सलून्स) 50 टक्के क्षमतेने चालवता येणार असून सलून्स सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेतच सुरु ठेवता येणार आहे.
नियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. खेळाडुंना बायो बबलमध्ये राहावे लागणार. प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहता येणार नाही. दर तीन दिवसांनी खेळाडुंची कोरोना चाचणी करणे बंधनकारक असेल.
अम्युझमेंट पार्क, किल्ले आणि स्थानिक पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद राहतील. शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार. मॉलमध्ये करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.
हॉटेल्स आणि रेस्टारंटस सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत 50 टक्के क्षमतेने चालवता येणार आहेत. महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल, तर कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआ चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक असणार आहे.
एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणार्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा दिली जाणार आहे. लसीचे दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई होणार असल्याने निर्बंधात म्हटले आहे.
MJGaAxjUileqF