अहमदनगर । वीरभूमी- 08-Jan, 2022, 04:01 PM
मागील काही दिवसापासून आटोक्यात असलेल्या कोरोना बाधितांचा आकडा आज शनिवारी अहमदनगर जिल्ह्यात अनब्रेक झाला. जिल्ह्यात आज तब्बल 225 कोरोना बाधित आढळल्याने आकडेवारी बरोबरच नगरकरांची चिंता वाढली आहे.
मागील दिवसापासून कोरोना बाधितांचा वेग दुप्पटीने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये अहमदनगर शहराचा आकडा 78 वर पोहोचला असून दुसर्या स्थानावर राहाता 26 तर तिसर्या स्थानी नगर ग्रामीण 17, कोपरगाव व श्रीगोंदा प्रत्येकी 14 असा क्रमांक लागतो.
मागील चार दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बुधवारी 115, गुरुवारी 156, शुक्रवारी 170 तर शनिवारी 225 असे सलग चौथ्या दिवशी कोरोना बाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. मागील चार दिवसात तब्बल 666 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे सक्रीय रुग्ण संख्येचा आकडा शुक्रवार पर्यंत 660 एवढा होता. या आकडेवारीत आजही मोठी वाढ होणार असल्याने चिंता वाढली आहे.
आज शनिवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 87, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 100 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 38 असे एकुण 225 कोरोना बाधित आढळले आहेत.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 78, राहाता 26 नगर ग्रामीण 17, कोपरगाव 14, श्रीगोंदा 14, मिलटरी हॉस्पिटल 9, नेवासा 9, इतर जिल्हा 8, श्रीरामपूर 8, संगमनेर 7, भिंगार 6, राहुरी 6, शेवगाव 6, पारनेर 5, इतर राज्य 4, जामखेड 3, पाथर्डी 3, कर्जत 2 असे कोरोना बाधित आढळून आले. तर एकमेव अकोले तालुक्यातील आजची रुग्ण संख्या शुन्यांवर आहे.
मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांची आकडेवारी दररोज शंभरच्या आत राहत होती. मात्र मागील तीन दिवसापासून एकुण आकडेवारीने शंभरी पार करत द्विशतक गाठण्यास सुरुवात केली तर आज चौथ्या दिवशी द्विशतक पार करत 225 वर पोहोचली आहे. यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. यामुळे नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
ftpQYTqLzVkybln