पाटाच्या बाजुने ऊस वाहतूक । शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार
अकोले । वीरभूमी - 11-Jan, 2022, 09:41 PM
अकोले शहरातून जाणार्या कोल्हार-घोटी रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यातच अगस्ती साखर कारखाना सुरू असल्याने ऊस वाहतूक करणार्या वाहनांची रहदारी वाढली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.
या वाहतूक कोंडीवर बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग व कारखाना प्रशासन यांच्या समन्वयातून पाटाच्या कडेने रस्ता खुला करून दिल्याने या मार्गाने ऊस वाहतूकीची वाहने जावू लागल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
अकोले शहरातुन जाणार्या कोल्हार -घोटी रस्त्याचे काँक्रीटिकरणाचे काम सध्या सुरू आहे. काँक्रीटीकरणामुळे शहरातून एकेरी वाहतून सुरू असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच सध्या अगस्ती सकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती. या वाहतूक कोंडीवर प्रशासनाने काहीतरी उपाय योजना करावी, अशी मागणी होत होती.
यावर वाहतूक कोंडी सोडवण्यावर अगस्ति सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेतला. यामध्ये पाटबंधारे विभागाच्या पाटाच्या बाजुला असलेल्या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणारी वाहने कारखान्याकडे आली तर शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, असा पर्याय पुढे आहे.
पाटावरून ऊस वाहतूक करणारी वाहने घेऊन जाण्यासाठी कारखाना प्रशासनाने बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या समन्वयातून धामणगाव रोडवरील घोलप वस्ती, सोमेश्वर मंदिर ते कारखाना रोडवरील बिरोबा मंदिर या दरम्यान असलेल्या पाटाच्या कडेने बैलगाडी ऊस वाहतूक आजपासून सुरू करण्यात यश आले.
या रस्त्याने अकोले व इंदोरी गटातील बैलगाडी व ट्रॅक्टर टायर वाहतूक कायम स्वरूपी चालू शकेल. यामुळे अकोले शहरातील वाहतुकीवरचा ताण निश्चित कमी होणार आहे. वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळणार आहे.
सर्व विभागांनी पुढाकार घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Comments