विजय उंडे । वीरभूमी- 15-Jan, 2022, 05:22 PM
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागलेल्या सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत बेलवंडी, टाकळी कडेवळीत व लिंपणगाव गटात नागवडे-भोस यांच्या किसान क्रांती पॅनलने सर्वच्या सर्व नऊ जागा जिंकुन विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यापासून दूर जात माजी उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी कडवे आव्हान उभे केले होते. त्यांना आ. बबनराव पाचपुते व बाळासाहेब नाहाटा यांनी साथ दिली. तर नागवडे यांना बाबासाहेब भोस यांनी साथ दिली.
निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर चिखल फेक करत गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले. यामुळे निवडणूक चुरशीची झाली होती. नागवडे कारखाना निवडणुकीकडे श्रीगोंदा तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
नागवडे कारखान्यासाठी आज शनिवारी मतमोजणी सकाळपासून सुरू आहे. सकाळी टाकळी कडेवळीत गटातील सर्वसाधारण जागेच्या तीन जागांसाठीच्या मतदानाची मतमोजणीत नागवडे-भोस गटाच्या किसान क्रांती पॅनलने तीनही जागेवर विजय मिळवला.
यामध्ये टाकळी कडेवळीत गट- किसान क्रांती पॅनल (नागवडे-भोस)- नेटके भाऊसाहेब (9860 विजयी), प्रशांत दरेकर (9,959 विजयी), सुरेश रसाळ (9723 विजयी) असे मते मिळवून विजयी झाले. तर विरोधी सहकार पॅनल (पाचपुते-मगर) गटाचे लक्ष्मण रसाळ (6536 पराभूत), हरिशचंद्र गव्हाणे (6583 पराभूत), रोहिदास पवार (6603 पराभूत) असे मते मिळाली.
बेलवंडी गटात किसान क्रांती पॅनल (नागवडे-भोस) चे भीमराव लबडे 9437 (विजयी), लक्ष्मण रायकर 9970 (विजयी), दत्तात्रय काकडे 9973 (विजयी) असे मिळून विजयी झाले. तर विरोधी गटाच्या सहकार पॅनल (पाचपुते-मगर) गटाचे आण्णासाहेब शेलार 6872 (पराभूत), तुळशीराम उमा रायकर 6486 (पराभूत), विकास ज्ञानदेव काकडे 6407 (पराभूत) असे मते मिळाली.
लिंपणगाव गटात किसान क्रांती (नागवडे-भोस) गटाचे विठ्ठल बबन जंगले 9548 (विजयी), विश्वनाथ माणिकराव गिरमकर 9892 (विजयी), प्रशांत शंकरराव शिपलकर 9314 (विजयी) हे उमेदवार विजयी झाली. तर सहकार पॅनलचे (पाचपुते-मगर) केशवराव निवृत्ती मगर - 7480 (पराभूत), शांताराम पांडुरंग भोईटे 6494 (पराभूत), हरिभाऊ माधव कुरुमकर 6494 (पारभूत) या उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला.
सध्या श्रीगोंदा गटाची मतमोजणी सुरू असून यामध्ये कोण बाजी मारते याकडे लक्ष लागले आहे.
Comments