नागवडे साखर कारखाना निवडणूक । 12 जागांवर नागवडे गटाचा विजय
विजय उंडे । वीरभूमी- 15-Jan, 2022, 06:56 PM
श्रीगोंदा ः
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत बेलवंडी, टाकळी कडेवळीत व लिंपनगाव गटानंतर श्रीगोंदा गट व सोसायटी मतदारसंघात किसान क्रांती गटाने विजयी मालिका कायम राखली आहे.
या विजयानंतर नागवडे कारखान्याच्या 12 जागांवर राजेंद्र नागवडे व बाबासाहेब भोस यांच्या किसान क्रांती पॅनलने विजय मिळवत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे दिसत आहे.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. बेलवंडी, टाकळी कडेवळीत, लिंपणगाव व श्रीगोंदा गटात आणि सोसायटी मतदारसंघात किसान क्रांती पॅनलने सर्वच्या सर्व 12 जागांवर विजय मिळवला आहे.
श्रीगोंदा गटात किसना क्रांती गटाच्या सुभाष आनंदराव शिंदे (9970 मते) व बाबासाहेब सहादू भोस (9874 मते) यांनी विजय मिळवला. तर सहकार पॅनलच्या जिजाबापू पर्वती शिंदे (6888 मते) व बापूसाहेब शामराव भोस (6349 मते) यांना पराभवाचा सामना करावा लागला.
तर सोसायटी मतदारसंघात किसान क्रांती पॅनलचे प्रमुख राजेंद्र शिवाजीराव नागवडे (25 मते) यांनी विजय मिळवला. तर सहकार पॅनलचे प्रविणकुमार बन्सीलाल नाहाटा (16 मते) यांना पराभव पत्कारावा लागला.
सध्या नागवडे कारखान्याच्या चार सर्वसाधारण गटासह सोसायटी मतदार संघ अशा 12 जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. या सर्व ठिकाणी किसान क्रांती पॅनलने सर्वच्या सर्व 12 जागा जिंकून विजय मिळवला आहे. तर सध्या काष्टी गटाची मतमोजणी सुरू असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
Comments