जिल्हाधिकारी संदीप निश्चित यांच्या हस्ते सपत्नीक पुजा
अहमदनगर । वीरभूमी- 17-Jan, 2022, 01:44 PM
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील प्रति जेजुरी म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणार्या श्री क्षेत्र कोरठन खंडोबा देवस्थानच्या पौष महिन्याच्या तीन दिवशीय यात्रा महोत्सव सुरवात झाली आहे.
सोमवार दि. 17 जानेवारी या दिवशी सकाळी अहमदनगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित व पत्नी सौ. शीतल निश्चित यांच्या हस्ते सकाळी 7 वाजता अभिषेक व महापूजा करण्यात आली.
यावेळी खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड, विश्वस्त अभय गुंजाळ, बन्सी ढोमे, सुरक्षा अधिकारी सुरेश सुपेकर, मंडळ अधिकारी पंकज जगदाळे, तलाठी फतले, श्री. उंडे, संतोष मंडगे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित म्हणाले की, श्री. खंडोबा हे सर्व सामन्यांचे कुलदैवत कायमच श्रद्धास्थानी राहिले आहे. आपल्या जन्मदिवसाच्या दिनालाच यात्रेनिमित्त देवाचा अभिषेक महापूजा व आरतीचा सपत्नीक लाभ प्रथमच लाभल्याने समाधान वाटते आहे. यात्रा उत्सव कोरोनामुळे रद्द असून त्यानुसार झालेले नियोजनाबाबतही त्यांनी देवस्थानमध्ये माहिती घेतली. मंदिर परिसराच्या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
यात्रा काळात खंडोबा मंदिर दर्शनासाठी 19 जानेवारी पर्यंत बंद आहे. पोलिसांकडून देवस्थानाला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. पारनेर पोलिस निरीक्षक घनश्यम बळप, क्रांती शुगर कारखाना पारनेर, अहमदनर पोलीस मित्र यांनी बंदोबस्त नियोजन ठेवले आहे. मंदिरावर आकर्षक रोषणाई केली आहे. मंदिर परिसर मात्र सुना- सुना वाटत आहे.
Comments