श्रीरामपूर । वीरभूमी - 18-Jan, 2022, 10:31 AM
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही विकास आघाडीने शेतकरी संघटनेच्या सर्व उमेदवारांचा पराभव करीत ‘अशोक’ साखर कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व कायम राखले. मात्र या निवडणुकीत मुरकुटे गटाचे मताधिक्य घटले आहे.
अशोक सहकारी साखर कारखान्यासाठी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली लोकसेवा विकास आघाडी आणि अॅड. अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना यांच्यात प्रमुख लढत झाली. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी, सहायक अधिकारी सर्जेराव कांदळकर, क्षेत्रीय अधिकारी संदीप रुद्राक्ष, रावसाहेब खेडकर, रतन त्रिभुवन, नामदेव खंडेराय, दीपक वाकचौरे, संजय पाटील आदींच्या मार्गदर्शखाली 16 टेबलवर मतमोजणी झाली.
या निवडणुकीत पढेगाव गट- रावसाहेब थोरात, हिंमत धुमाळ, यशवंत बनकर, कारेगाव गट- भाऊसाहेब ऊंडे, प्रफुल्ल दांगट, ज्ञानेश्वर शिंदे, टाकळीभान गट- ज्ञानदेव पटारे, भानुदास मुरकुटे, पुंजाहरी शिंदे, वडाळा महादेव गट- कोंडीराम ऊंडे, ज्ञानेश्वर काळे, उंदिरगाव गट- बाबासाहेब आदिक, विरेश गलांडे, आदिनाथ झुराळे, महिला मतदारसंघ- शितल गवारे, हिराबाई जाधव, इतर मागासवर्गीय मतदारसंघ- अमोल कोकणे, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ- यशवंत रणनवरे, योगेश विटनोर. ब वर्ग मतदारसंघ- सोपानराव राऊत आदी विजयी झाले.
शेतकरी संघटनेकडून जितेंद्र भोसले, दत्तात्रय लिप्टे, विलास थोरात, युवराज जगताप, अरुण कवडे, दिलीप पवार, डॉ. वंदना मुरकुटे, विष्णुपंत खंडागळे, खंडेराव पटारे, अर्चना उंडे, शरद पवार, नानासाहेब गवारे, अनिल औताडे, अनिल, नीलेश आदिक, शिवाजी शेजूळ, प्रकाश जाधव, अर्चना पानसरे, शांताबाई जाधव, नितीन पटारे, प्रवीण देवकर, कार्लस साठे आदींना पराभवाचा सामना करावा लागला.
निवडणुकीदरम्यान पोलिस निरीक्षक संजय सानप व मधुकर साळवे यांचे नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
mUBQKcqNVTgfyFR