जलसंधारण, मृद व रोजगार हमी योजनेचे सचिव दिलीप पांढरपट्टे यांची भाळवणीला भेट
भाळवणी । वीरभूमी - 18-Jan, 2022, 10:37 AM
आदर्शगाव योजनेच्या माध्यमातून भाळवणी येथील नागबेंदवाडी परिसरात बांधण्यात आलेले सिमेंट बंधारे पुर्णपणे भरले असून त्याचा फायदा परिसरातील पाणीपातळीत वाढ होण्यासाठी होणार असल्याचे मत राज्याच्या जलसंधारण, मृद व रोजगार हमी योजनेचे सचिव दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केले.
श्री. पांढरपट्टे हे नुकतेच आदर्शगाव हिवरे बाजार येथे आले होते. त्यावेळी त्यांनी भाळवणी येथे करण्यात आलेल्या आदर्शगाव योजनेच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार होते. यावेळी त्यांनी नागबेंदवाडी परिसरात केलेल्या कामांची पाहणी केली.
याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचौळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी चंद्रकांत मुळे, शाखा अभियंता ऋषिकेश चव्हाण, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, कृषी पर्यवेक्षक शंकर खाडे, सरपंच सौ. लिलाबाई रोहोकले, भाळवणीचे उपसरपंच इंजि. संदिप ठुबे, ग्रामपंचायत सदस्य कोंडीभाऊ तरटे, रंगनाथ रोहोकले, बाबुशेठ रोहोकले, यशवंत ग्रामीण विकास संस्थेचे शिवाजी ठाणगे, बी. वाय. रोहोकले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments