संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध
पारनेर । वीरभूमी - 18-Jan, 2022, 10:40 AM
अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणार्या पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार पतसंस्थेची नुकतीच संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली असून अध्यक्षपदी सुशिला दिलीपराव ठुबे व उपाध्यक्षपदी पी.के.ठुबे यांची बिनविरोध निवड पार पडली.
निवडणूक निर्णय अधिकारी रामेंद्रकुमार जोशी, सहाय्यक निवडणूक अधिकारी अॅड. माणिकराव मोरे, अॅड. एम. डी.पवार, कार्यकारी संचालक गोपाळ ठुबे यांनी या बिनविरोध प्रक्रियेचे काम पाहीले. यावेळी संचालक सुभाष नवले, राजेंद्र व्यवहारे, पो.मा.झावरे, संपत खरमाळे, भो मा ठुबे, गवराम गाडगे, भास्कर ठुबे, भगवान वाळुंज, सुहास शेळके, राजेंद्र रोकडे, मंगेश गागरे, दादाभाऊ नवले, मधुकर साळवे, सह कार्यकारी संचालिका नमिता ठुबे आदी उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त अध्यक्षा सुशिला ठुबे म्हणाल्या की, सभासद, खातेदार, संचालक मंडळ व कर्मचारी या सर्वांना सोबत घेऊन कान्हुर पठार पतसंस्थेचा कारभार पूर्वी प्रमाणेच करणार असून स्व.दिलीपराव ठुबे यांनी घालुन दिलेला आर्थिक शिस्तीचा वारसा आम्ही सर्व पुढे नेणार आहोत. सहकार क्षेत्रात पतसंस्थेची प्रगती आम्ही सर्वांच्या सहकार्याने पुढे नेणार आहोत.
TnkZOBeUmxiaWNw