पाथर्डी । वीरभूमी- 18-Jan, 2022, 12:42 PM
आमच्या घराण्याला राजकारणाचा कौटुंबिक वारसा असला तरी देखील राजकारणात येण्याचे अजून ठरवलेले नाही. मात्र समाजकारणाचा वारसा प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न करतोय. आगामी काळात शहराच्या सर्व क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्वोच्च योगदान देऊ. सर्व सामान्य नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आवश्यकता वाटेल तेव्हा संपर्क करावा, माझे सर्वोतोपरी सहकार्य राहील, असे प्रतिपादन उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुलदीप उर्फ बंडूशेठ भांडकर यांनी केले.
मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने डॉ. भांडकर यांनी नुकतेच शहरातील पत्रकारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार तज्ञ शंकर उर्फ नाना राऊत, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, उमेश मोरगावकर, अविनाश मंत्री, अॅड.हरीहर गर्जे, राजेंद्र सावंत, अॅड. राणा खेडकर, अॅड. सचिन बडे, पप्पु चौनापुरे, सोमनाथ रोडी, कृष्णा वेदपाठक, बबलु कांबळे, अनिल काळोखे यांच्यासह सर्व पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना राऊत म्हणाले की, शहराच्या राजकारणात व जडणघडणीत भांडकर परीवाराचे मोठे योगदान आहे. डॉ. कुलदिप यांना मोठा राजकीय वारसा आहे व त्यांच्या सारख्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या, प्रामाणिक, संवेदनशील व धाडसी वृत्ती असलेल्या तरुणांची आज शहराला गरज असल्याचे सर्वसामान्य नागरिकांना वाटत असल्याने त्यांनी राजकारणात उतरावे अशी सर्वांची इच्छा आहे.
आपल्या संघटन कौशल्याने मोठा मित्र परिवार आपण शहरात निर्माण केला. जनतेच्या अनेक समस्यांची सोडवणूक करून अनेकांना मदतीचा हात दिला आहे. मागील तीन-चार. वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम व व्यवसाया निमित्ताने शहराला आपण परिचित आहात. आगामी पालिका निवडणुकीत सर्व सामान्य नागरिकांचे व व्यापार्यांचे प्रतिनिधित्व आपण करावे. आपल्या वरीष्ठ पातळीवरील राजकीय संबंधांचा उपयोग शहराच्या विकासासाठी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी डॉ.कुलदीप भांडकर यांनी सर्वांचे स्वागत करून सन्मान केला. या कार्यक्रमासाठी पत्रकार नितीन गट्टाणी, अमोल कांकरिया, राजेंद्र भंडारी, अभिजित खंडागळे, बाबासाहेब गर्जे, अनिल खाटेर, सचीन दिनकर, संदीप शेवाळे, नारायण पालवे, राजेंद्र देवढे, अजय गांधी आदी पत्रकार उपस्थित होते.
RUDuaoPrk