राष्ट्रवादी 12, काँग्रेस 3 तर भाजपाला 2 जागा
कर्जत । वीरभूमी- 19-Jan, 2022, 02:05 PM
कर्जत नगरपंचायतीच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. मात्र या पंचवार्षिक निवडणुकीत आ. रोहित पवार यांनी आपला करिश्मा दाखवत राष्ट्रवादीला 12 तर काँग्रेसला 3 अशा 15 जागांवर आघाडीला यश मिळवता आले. 0 ते 12 असा राष्ट्रवादीने प्रवास केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
अखेर कर्जत नगरपंचायतीत सत्तापरिवर्तन झाले असून या निवडणुकीत भाजपाला फक्त 2 जागांवर विजय मिळवता आला. यामुळे कर्जत नगरपंचायतीवर आ. रोहित पवार यांनी एकहाती वर्चस्व मिळवले आहे.
तर भाजपाचे माजीमंत्री राम शिंदे यांना अवघ्या 2 जागा मिळत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अखेर विकासाच्या राजकारणाला कर्जतच्या जनतेने साथ दिली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांनी दिली.
कर्जत नगरपंचायतीच्या 17 जागेसाठी दोन टप्प्यात मतदान होऊन आज बुधवारी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात मतमोजणी झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने प्रथम क्रमांकाची पसंती देत 12 जागेवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. तर आघाडीचा घटक पक्षाच्या काँग्रेसने आपल्या तिन्ही जागेवर विजय संपादन करीत राष्ट्रवादीला साथ दिली.
आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेसला 15 जागा मिळवत भाजपाला धोबीपछाड दिली. तर भाजपाला अवघ्या दोनच जागेवर समाधान मानत आपली अब्रू वाचविता आली.
माजीमंत्री राम शिंदे यांना पुन्हा एकदा आ. रोहित पवार यांनी जोर का झटका दिला. माजीमंत्री राम शिंदे यांनी प्रचारात आ. पवार यांच्यावर दहशतीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता. मात्र आजच्या निकालाने कर्जतकरांनी तो झुगारून लावला.
आ. पवार यांनी केवळ विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करीत जनतेला साद घातली होती. जनतेने त्यास मान्यता देत आ. रोहित पवार यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे.
कर्जत नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते शून्य होते. तर आजच्या निवडणुकीत 12 उमेदवारांनी विजय संपादन करीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने मोठे यश मिळवत भाजपाच्या ताब्यातील नगरपंचायत आपल्याकडे खेचली.
प्रभाग क्रमांक दोनचा निकाल प्रशासनाकडून प्रलंबितच-
प्रभाग क्रमांक दोन जोगेश्वरवाडीच्या भाजपाचे उमेदवार नीता कचरे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर त्यास भाजपाने न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे आजच्या निकालात जोगेश्वरवाडीचा निकाल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला नाही. मात्र कचरे यांच्या माघारीनंतर राष्ट्रवादीचे लंकाबाई खरात यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने त्याचा विजय निश्चित मानला जात आहे.
Comments