आरक्षण सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुले । बाळासाहेब वडजे, सौ सोनालीताई नाईकवाडी दावेदार
अकोले । वीरभूमी- 27-Jan, 2022, 05:59 PM
आज गुरुवारी मंत्रालयात राज्यातील 135 नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये नुकतीच निवडणूक पार पडलेल्या अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण (व्यक्ती) निघाले आहे.
अकोले नगरपंचातीच्या नगराध्यक्ष पदासाठी बाळासाहेब वडजे व सौ. सोनालीताई नाईकवाडी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
नुकतीच अकोले नगरपंचायतीची निवडणूक होऊन भाजपाने 12 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यामुळे भाजपाचीच सत्ता नगरपंचायत वर आली हे निश्चित झाले. मात्र एस. सी प्रभागात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्वेताली मिलिंद रुपवते (घोलप) या विजयी झाल्याने सर्वपक्षीयासह तालुक्याचे लक्ष नगराध्यक्ष पद आरक्षण सोडतीकडे लागले होते.
आज गुरूवारी दुपारी 4 वा मुंबई येथे मंत्रालयात राज्यातील 135 नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. कोविड प्रादुर्भाव सुरु असल्याने या सोडतीचे दूरदृष्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्तालयात आयोजित केले होते.
यावेळी चिठ्ठीद्वारे काढण्यात आलेल्या आरक्षणात अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण (व्यक्ती) निघाले आहे. आता भाजपाचीच सत्ता असल्याने नगराध्यक्ष भाजपाचाच होणार हे निश्चित झाले असुन या पदासाठी भाजपामधुन बाळासाहेब वडजे किंवा भाजपच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सोनालीताई नाईकवाडी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
मात्र आता माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभवराव पिचड हे कोणाला पसंती देतात हे लवकर कळेलच. दोन्हीही उमेदवार कर्तुत्ववान आहेत. दोघेही अनुभवी आहेत. तसेच दोघेही दुसर्यांदा मोठ्या मताधिक्याने नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. दोघांनाही प्रशासकीय कामाचा अनुभव असल्याने अकोलकर दोघांनाही पसंदी देऊ शकतात.
OfhHnozQFNTR