अहमदनगर । वीरभूमी- 31-Jan, 2022, 04:22 PM
राज्य शासनाच्या नियोजन विभागाने आज सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हा नियोजन समितीमध्ये संसद व विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित दोन सदस्यांसह जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले चार नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रितामध्ये 14 सदस्य अशा एकूण 20 सदस्यांची नियुक्ती जिल्हा नियोजन समितीमध्ये केली आहे.
जिल्हा नियोजनच्या विशेष निमंत्रितांमध्ये आघाडीमधील नेते व कार्यकर्ते यांना संधी दिली असून भाजपाला यामधून वगळण्यात आले आहे. यामुळे भाजपामधून नाराजीचा सूर आहे.
जिल्हा नियोजन निमंत्रीत सदस्यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील नेते व कार्यकर्ते यांचा समावेश आहे. समितीचे अध्यक्ष म्हणुन पालकमंत्री हसन मुश्रीफ तर सचिव म्हणुन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले जिल्हा नियोजन समितीवर काम पाहणार आहेत.
शासनाने नियुक्त केलेले सदस्यामध्ये खालीप्रमाणे निवडी शासन आदेश क्र. डिएपी-2021/प्र.क्र.40/का-1481-अ नुसार या निवडी जाहीर केल्या आहेत.
यामध्ये संसद व विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित सदस्य- खा. सदाशिव किसन लोखंडे, श्रीरामपूरचे आ. लहू नाथा कानडे यांची नियुक्ती केली आहे. तर जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य- म्हणुन प्रभाकर रेवणनाथ गाडे (रा. बारागाव नांदुर), अविनाश गोविंदराव आदिक (रा. श्रीरामपूर), बाबासाहेब दिघे (रा. श्रीरामपूर), हर्षवर्धन अशोक बोठे (रा. वाळकी) यांची नियुक्ती केली आहे.
तर विशेष निमंत्रित सदस्यामध्ये शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले पाटील (रा. शेवगाव), ऋषिकेश प्रताप ढाकणे (रा. पाथर्डी), बाबासाहेब भिमाजी तरटे (रा. भाळवणी), पोपटराव गणुजी दराडे (रा. समशेरपूर), सोनाली राहुल रोहमारे (रा. कोपरगाव), प्रवीण विठ्ठल घुले (रा. कर्जत), बी. आर. चकोर (रा. संगमनेर),
मधुकर नवले (रा. अकोले), जयंत रामनाथ वाघ (रा. अहमदनगर), विशाल राजेंद्र झावरे (रा. कोपरगाव), संजय नारायण काशीद (रा. जामखेड), शरद मधुकर झोडगे (रा. नागरदेवळे), भागवत बाळासाहेब मुंगसे (रा. देवळाली प्रवरा), अभिजीत भगवान खोसे (रा. बुरुडगाव रोड, अहमदनगर) यांना समितीमध्ये स्थान मिळाले आहे.
DmwBqfONzkEtrZJP