अकोले । वीरभूमी - 09-Feb, 2022, 05:18 PM
अकोले तालुक्यातील आंबड विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच राजकीय पक्षाच्या तसेच गावातील ज्येष्ठ तरुण यांच्या पुढाकाराने बिनविरोध पार पडली. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडीही बिनविरोध पार पडली.
यावेळी अध्यक्षपदी परिक्षित भोर यांची तर उपाध्यक्षपदी कैलास कानवडे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
अंबड सेवा सोसायटीच्या निवडणुकीत तब्बल 36 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गावच्या विकासासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, या दृष्टीने उपसरपंच नाथा भोर आग्रही होते. माघारीचा एक दिवस शिल्लक असल्यामुळे त्यांनी गावात शिपाई मार्फत दंवडी देऊन तातडीची ग्रामसभा आयोजित करुन सर्व राजकीय पक्षाचे पुढारी ग्रामस्थ व सभासद यांना संस्था निवडणूक बिनविरोधचे आवाहन केले. त्याला सर्व उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी उत्तम प्रतिसाद देऊन माघारी अर्जावर सह्या करून दिल्या.
त्यानंतर गावातील ज्येष्ठ तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष व सभासद अशा दहा जणांच्या कमेटीला निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामस्थांच्या मते ठराव संमत करण्यात आला. त्यानुसार त्यांनी एकुण 36 उमेदवारी अर्जांमधुन 24 अर्ज माघारीसाठी निवडणूक अधिकारी यांचेकडे सुपुर्द करुन 12 संचालक मंडळाच्या नावावर ग्रामसभेत सुधीर कानवडे यांनी वाचन करून निवड केली.
एकूण 13 जागेपैकी एक जागा विमुक्त जाती/भटक्या जमातीसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झालेमुळे ती जागा रिक्त राहिली. त्यामध्ये सर्वसाधारण खाते कर्जदार मधुन 8 संचालक, महिला राखीव मध्ये 2 संचालक, इतर मागास प्रवर्गातुन 1, अनुसूचित जाती व जमातीमधुन 1 अशा एकुण 12 संचालकांची निवड निवडणूक अधिकारी साळुंखे व सहाय्यक निवडणूक अधिकारी विकास जाधव यांनी बिनविरोध झाल्याचे जाहिर केले.
त्याचप्रमाणे सोसायटीच्या अध्यक्षपदी परिक्षित मनोहर भोर व उपअध्यक्षपदी कैलास गंगाधर कानवडे यांंची एकमताने निवड करण्यात आली. तसेच संचालकपदी नामदेव लक्ष्मण भोर, माधव कारभारी जाधव, बबन लक्ष्मण भोर, रामहारी विठोबा भोर, अरुण गंगाधर जाधव, मनोज यादव जाधव, आशा भास्कर नवले, अलका संजय भोर, शिवाजी गोपाळा कोल्हाळ, नावजी कुशाबा कातोरे यांची संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
सर्व नुतन संचालकांचे ग्रामस्थ व सभासदांनी अभिनंदन केले. गावच्या एकोप्याने पुन्हा एकदा सेवा सोसायटीची सहाव्यांदा निवडणूक बिनविरोध करून तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण केला.
त्याबद्दल मा मंत्री मधुकरराव पिचड, खा. सदाशिवराव लोखंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सिताराम गायकर, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मधुकरराव नवले, शेतकरी नेते दशरथ सावंत, शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी अभिनंदन केले आहे.
qdFvEbpyAmlIjk