अकोले । वीरभूमी - 09-Feb, 2022, 10:48 PM
भाजपाच्या नगरसेवकांनी प्रभागातील मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय उभारावे, अशी सूचना भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आ. वैभवराव पिचड यांनी व्यक्त केली होती.
त्याला प्रतिसाद देत प्रभाग क्र. 14 चे नगरसेवक शरद नवले यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्या गुरुवार दि. 10 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता माजीमंत्री मधुकरराव पिचड व माजी आ. वैभवराव पिचड यांचे हस्ते व शिवाजीराजे धुमाळ यांचे अध्यक्षतेखाली उद्घाटन होत आहे.
अकोले शहरातील मतदारांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आ. वैभवराव पिचड यांचे नेतृत्वाला विश्वास दाखवून बहुमताने भाजपाचे 12 नगरसेवक निवडून दिले. यानंतर विजयी नगरसेवकांना मार्गदर्शन व सुचना करताना मा. आ. वैभवराव पिचड यांनी सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागात मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देताना मतदारांना संपर्कासाठी प्रभागात जनसंपर्क कार्यालय उभारावे असे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वात प्रथम प्रभाग क्र. 14 चे नगरसेवक शरदभाऊ नवले यांचे कार्यालयाचे उद्घाटन उद्या गुरूवार दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभवराव पिचड यांचे हस्ते व जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ यांचे अध्यक्षतेखाली होत आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य कैलासराव वाकचौरे, जालिंदर वाकचौरे, आर. पी. आयचे नेते विजयराव वाकचौरे, अमृतसागर दूध संघाचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अकोले एज्युकेशन अध्यक्ष जे. डी. आंबरे, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, भाजप जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सोनालीताई नाईकवाडी, भाजप तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, अॅड.वसंतराव मनकर, अॅड. बी. जे. वैद्य, चंद्रकांत सरोदे, मच्छिंद्र मंडलिक, भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
तरी या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनास सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगरसेवक शरद नवले यांनी केले आहे.
tFlDdcoeBgsIw