नगराध्यक्षपदी विजय औटी तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेराव यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब
पारनेर । वीरभूमी - 16-Feb, 2022, 10:17 AM
पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा कौल न देता राष्ट्रवादी काँग्रेस 7, शिवसेना 6, शहर विकास आघाडी (अपक्ष) 2, भाजपा 1 व अपक्ष 1 असे नगरसेवक निवडून देऊन पारनेर नगरपंचायत त्रिशंकू केली होती.
त्यानंतर मात्र दुसर्याच दिवशी आमदार निलेश लंके हे अॅक्शनमोडमध्ये येऊन त्यांनी नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवण्यासाठी तीन अपक्षांना आपल्या पक्षात घेऊन राष्ट्रवादीचे संख्याबळ दहापर्यंत नेले आहे.
आज नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदांची निवड होणार असून आता नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय सदाशिव औटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. तर उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखा अर्जुन भालेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याचे समजते.
उपनगराध्यक्षपदी भालेकर यांचीही निवड होण्याची औपचारिकता बाकी आहे. विसर्जित नगरपंचायतीतील फक्त सुरेखा अर्जुन भालेकर या एकमेव पुन्हा नगरसेविका म्हणुन निवडून आलेल्या आहेत. तर पंचायतीच्या 17 पैकी 16 नगरसेवकांना प्रथमच संधी मिळाली आहे.
आज बुधवारी दुपारी 12 वाजता नगरपंचायतीचे प्रशासक तथा प्रांताधिकारी सुधाकर भोसले व सहाय्यक सुनीता कुमावत यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवड होणार असून वरील दोन्ही नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
यामुळे पारनेर नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे आ. निलेश लंके यांची एकहाती सत्ता येणार आहे.
Comments