अकोले । वीरभूमी- 16-Feb, 2022, 03:28 PM
अकोले नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक नगरपंचायत सभागृहात पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भाजप चे 12 आणि विरोधी राष्ट्रवादी शिवसेना आघाडीचे 4 असे 16 नगरसेवक सभेला उपस्थित होते.
भाजप च्या सौ सोनाली नाईकवाडी याना 12 मते पडली. तर नवनाथ शेटे यांना 4 मते मिळाली. काँग्रेसचे एकमेव नगरसेवक प्रदीपराज नाईकवाडी सभागृहाकडे फिरकलेच नाहीत. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मंगरुळे यांनी नगराध्यक्ष पदी सौ सोनाली नाईकवाडी विजयी झाल्याचे घोषित केले.
उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप चे बाळासाहेब वडजे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे ते बिनविरोध निवडून आले. माजी मंत्री मधुकरराव पिचड,भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री, माजी आमदार वैभवराव पिचड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीराम डेरे यांनी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी संदर्भात नगरसेवकांची वैयक्तिक मते जाणून घेतली.
त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी उपनगराध्यक्ष पदी बाळासाहेब वडजे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर नगरपंचायत मध्ये येऊन माजी आमदार वैभवराव पिचड, जि. प. अर्थ व बांध समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, जेष्ठ शिवाजीराजे धुमाळ, अॅड. वसंतराव मनकर, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा ध्यक्ष अॅड.श्रीराज डेरे, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, सरचिटणीस यशवंतराव आभाळे, जे. डी. आंबरे पा., आर. पी. आय चे चंद्रकांत सरोदे, शांताराम संघारे, बाजार समितीचे माजी सभापती सुधाकर देशमुख, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शेटे, चेतन नाईकवाडी, डॉ.रवींद्र गोर्डे, परशुराम शेळके, अमोल वैद्य, सोमेश्वर धुमाळ, विजय पवार, रवींद्र शेणकर, नवनाथ मोहिते, मोसीन शेख,हुसेन शेख,प्रकाश साळवे, सौरभ देशमुख यांच्या उपस्थितीत बाळासाहेब वडजे यांनी आपला उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. वैष्णवी धुमाळ हे त्यांचे सूचक तर सागर चौधरी हे अनुमोदक आहेत.
या बैठकीस नगरसेवक सागर चौधरी, प्रतिभा मनकर, हितेश कुंभार, शितल वैद्य, वैष्णवी धुमाळ, जनाबाई मोहिते, तमन्ना शेख, शरद नवले, कविता शेळके, विरोधी नवनाथ शेटे, आरिफ शेख, श्वेताली रुपवते, विमल मंडलिक, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे हे उपस्थित होते.
अकोले नगरपंचायतचे प्रशासक, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी आपल्या प्रशासकपदाचा पदभार सोडला व नूतन नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांचे कडे नगरपंचायतची सूत्रे बहाल केली.
नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्षाच्या निवडी घोषित होताच भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करीत या निवडीचे स्वागत करण्यात आले. नूतन पदाधिकारी व नगरसेवक -नगरसेविका यांची विजयी रथातून शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.ठीकठिकाणी नूतन पदाधिकारी व माजी आमदार वैभवराव पिचड यांचे स्वागत करण्यात आले.
EZKylbiTxfvrSY