राजकीय जाणकरांच्या भुवया उंचावल्या । भेटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
पाथर्डी । वीरभूमी- 20-Feb, 2022, 08:10 PM
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी शनिवारी सकाळी कासार पिंपळगाव येथील राजळे यांच्या सिद्धसावली (झोपडीवर) निवासस्थानी जावून आमदार मोनिका राजळे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी दत्ता सोनटक्के, संदीप आव्हाड, गणेश टेके आदी उपस्थित होते.
दरम्यान, अभय आव्हाड यांनी वाढदिवसाचे निमित्त साधत आ. राजळे यांना थेट घरी जाऊन शुभेच्छा दिल्याबद्दल आपण आगामी पालिका निवडणुकीत आमदार राजळे यांच्याच बरोबर असल्याचे संकेत एक प्रकारे दिले आहेत.
तर दुसरीकडे विरोधी गटात मात्र राजळे-आव्हाड यांची सहमती एक्सप्रेस एकाच ट्रॅकवर बरोबरीने चालते की काय? याचा धसका घेतला आहे. कारण,अभय आव्हाड यांना मानणारा मोठा वर्ग पाथर्डी शहरात असल्यामुळे ते कोणाच्या बाजूने उभे राहतात याला जास्त महत्व प्राप्त झाले आहे.
राजळे- आव्हाड यांच्या भेटीची मोठी चर्चा आज दिवसभर सोशल मीडियावर रंगली होती.
Comments