शेवगाव । वीरभूमी- 04-Mar, 2022, 02:25 PM
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शेवगाव-पाथर्डी भाजपाच्यावतीने खा. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी डॉ. सुजय विखे यांनी आघाडी सरकारवर टीका करत नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली.
दाऊद इब्राहिम यांच्या संबध असल्याच्या आरोपावरून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यांना अटक केली असतांनाही आघाडी सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही. आघाडी सरकारने मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजपाच्यावतीने शेवगाव शहरातून मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन दिले.
मोर्चा शेवगाव तहसील कार्यालयात आल्यानंतर ‘नवाब हटाओ, देश बचाओ’, दाऊदच्या दलाल मंत्र्याचा राजीनामा घ्या, अशी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयाच्या दारातच धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांच्यावतीने नायब तहसीलदार मयूर बेरड यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान खा. डॉ. सुजय विखे यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आघाडी सरकारवर टीका केली.
या आंदोलनात भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, बापूसाहेब पाटेकर, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्यूजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकिशोर शेळके,
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, अजय रक्ताटे, प्रतीक खेडकर, शेवगावचे उपनगराध्यक्ष वजीर पठाण, सरचिटणीस भिमराज सागडेे, बजरंग घोडके, धनंजय बडे, गुरुनाथ माळवदे, कचरु चोथे, वाय. डी. कोल्हे, एकनाथ आटकर, संभाजी वाघ, दत्तात्रय बडे, अॅड. प्रतिक खेडकर, विजय कापरे, पृथ्वीराज पाथरे, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ZRVNkiLDJBl