मंगळवार दि. 8 मार्चला वरुर येथे वितरण
शेवगाव । वीरभूमी - 04-Mar, 2022, 02:29 PM
‘धाकटी पंढरी’ श्रीक्षेत्र वरूर येथील भक्त पुंडलिक देवस्थान समितीच्या वतीने दिल्या जाणार्या (सन 2021-22) ‘पंढरीचा वारकरी’ या पुरस्कारासाठी आव्हाणे येथील ज्येष्ठ वारकरी व ग्रामीण कीर्तनकार केशव महाराज गुजर यांची निवड करण्यात आली आहे.
याबाबतची घोषणा देवस्थान समितीचे अध्यक्ष माणिकराव म्हस्के यांनी केली. सन्मानचिन्ह, महावस्त्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सर्वश्री वामनराव म्हस्के, विष्णू पाटील म्हस्के, नानासाहेब वावरे गुरुजी, मधुकर वावरे, अशोक खांबट आदींच्या निवड समितीने श्री. गुजर यांच्या नावाची शिफारस केली.
या पुरस्काराचे वितरण मंगळवार दि. 8 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता वरुरच्या त्रिवेणी संगमावरील नाम सप्ताह समारोप कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ह.भ.प. केशव महाराज गुजर यांचे वरुर येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष दिनकर महाराज अंचवले, आखेगाव येथील जोग महाराज संस्कार केंद्राचे महंत राम महाराज झिंजुर्के यांच्यासह संत-महंतांनी अभिनंदन केले आहे.
AgFSqdUxJCQlIbi