तिसगाव । वीरभूमी - 07-Mar, 2022, 01:39 PM
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने आ. मोनिकाताई राजळे यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवार दि. 8 मार्च 2022 महिला दिनानिमित्त गावातील महिलांसाठी पाककला, निबंध व रांगोळी स्पर्धा व आरोग्य तपासणी व मागदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच मोनालीताई राजळे यांनी दिली.
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार दि. 8 मार्च 2022 रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या जुन्या इमारतीमधील माणिक कला दालन येथे महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये सीबीसी रक्त तपासणी, रक्तातील साखर तपासणी, थायरॉड चाचणी व इतर आवश्यक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच विद्यार्थींनीसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धेसाठी ‘वृक्षाचे मानवी जीवनातील महत्व’, प्रदूषण एक समस्या’, माझी वसुंधरा अभियान, लेक वाचवा-लेक शिकवा, स्त्री पुरुष समानता’ हे विषय देण्यात आले आहेत.
तसेच ई-श्रमकार्ड नोंदणीसाठी पात्र असलेल्या 16 ते 59 वयोगटातील महिलांची नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच सर्व कामगार महिला/बचत गट महिला यांची ई-श्रमकार्ड नोंदणी करण्यात येणार आहे.
महिला दिनानिमित आयोजित रांगोळी स्पर्धेसाठी स्त्री भ्रूण हत्या, भारतीय सण उत्सव, माझी वसुंधरा अभियान, हॅपी वूमन डे, आजादीचा 75 वा अमृतमहोत्सव, सलाम स्त्री शक्तीला हे विषय देण्यात आले आहेत. तरी स्पर्धेमध्ये भाग घेणार्या महिलांनी पाककृती घरून बनवून आणावी तर रांगोळी स्पर्धेसाठी नाव नोंदणी करून स्पर्धेठिकाणी काढावी लागणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे, डॉ. अंबिका वाघ-वाकचौरे, डॉ. स्नेहल घाडगे या मागदर्शन करणार आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी महिला व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच मोनालीताई राजळे, उपसरपंच आशाताई तिजोरे, ग्रामविकास अधिकारी प्रमोद म्हस्के व सदस्यांनी केले आहे.
dDyBsaEW