कोपरगाव । वीरभूमी - 16-Mar, 2022, 02:03 PM
चैतन्य कानिफनाथ मढी येथील गोपाळ समाज मानाची होळी मानकरी समाजाला विश्वासात न घेता पोलीस बंदोबस्तात पेटवीत असल्याने होळीच्या दिवशी समाजाची संख्या नगण्य तर पोलीस बंदोबस्त शेकडोंच्या संख्येने असल्याने होळी प्रशासनाची की गोपाळाची? असा प्रश्न प्रखरतेने पुढे येत असल्याने ही भावना समाज एकात्मते मध्ये दुरावा निर्माण करत असल्याचे मत गोपाळ समाज ऐक्यवादी नेते रमेश भोंगळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
चैतन्य कानिफनाथ मढी येथील यात्रेस 17 मार्च रोजी सकाळी कैकाडी समाजाची काठी कळसास स्पर्श करुन सुरुवात होवुन सायंकाळी दत्त बारवे जवळ गोपाळ समाजाची मानाची होळी मानकर्यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात पेटनार असल्याने होळी प्रशासनाची की, गोपाळाची? असा प्रश्न प्रखरतेने पुढे येत असल्याने सामाजीक ऐक्यास हानी पोहचत आहे.
पाथर्डी न्यायालयात 2008 साली झालेल्या सुलेनाम्यात माणिकराव लोणारे, रघुनाथ कालापहाड, किसनराव हंबीरराव, जगन्नाथ माळी, पुंडलीक नवघरे, सुंदर गिर्हे या सहा लोकांनी होळी पेटवावी असे ठरले. आजपर्यंत हा मान वरील सहा लोकांनी परस्पर समाजास विश्वासात न घेता घरातच वाटुन घेत भावकीसह समाजास वार्यावर सोडले. नाथांच्या मंदिराच्या बांधकामासाठी केलेल्या योगदानातुन ताम्रपट लिखित मान समाजास मिळाला आहे.
गोपाळ समाजातील सामाजिक संघटना या ‘होळी ऐके होळी’ हा एक कलमी कार्यक्रम राबवण्यातच व्यस्त असल्याने समाजाचे मुलभुत प्रश्न अद्यापही शासन दरबारी अनुत्तरीत आहेत. प्रभावी नेतृत्वाच्या झळा समाज अद्यापही सोसत आहे. दत्त बारवे जवळ कसरतीचे खेळ दाखवत एकोप्याने गडावर वाजत गाजत जावुन नाथांच्या चरणी लिन होत देवस्थानकडुन मानाच्या गोवर्या मानकर्यांच्या हस्ते स्विकारत दत्त बारवे जवळ होळी पेटवण्याची पंरपरा आजही गुण्यागोविंदाने पार पाडत असतात.
मानकर्याद्वारे पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात दरवर्षी काही असामाजिक तत्व गोंधळ घालण्याच्या मनस्थितीत असल्याचा वांरवार होत असलेला उल्लेख हा समाजाप्रती कृतज्ञपणाचा असुन आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी केलेला सर्व खटाटोप असल्याचे सुर समाजमनातुन उमटत आहेत.
रमेश भोंगळ यांच्या नेतृत्वाखाली काही सामाजिक संघटना मानकर्यांचे मन वळवून भावकितल्या इतरांनाही मान मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. समाजाने मोठ्या संख्येने होळीच्या कार्यक्रमासाठी गोवर्या घेवुन येण्याचे आवाहन अंबादास धनगर, सुभाष गव्हाणे, नंदकुमार पवार, भाऊसाहेब चौगुले, संदीप जाधव, भरत गव्हाणे, रमेश पवार, दत्ता चौगुले, आसाराम गव्हाणे, दिलीप कुर्हे, रविभाऊ गव्हाणे, दत्तात्रय भोसले, सुनिल भोसले आदिनी केले आहे.
Comments