शेवगाव । वीरभूमी - 24-Mar, 2022, 10:14 AM
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुंग्यांची भूमिका घेऊन सत्तेच्या खुर्चीवर वर्षानुवर्षापासून बसलेल्या भूजंगांना अलगदपणे बाजूला सारून सत्ता परिपर्तन घडविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केले.
शेवगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील ममता लॉन मध्ये आयोजित तालुका कार्यकारिणीच्या नव नियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार व अगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित पूर्व तयारीच्या चिंतन बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात घोंगडी बैठकांचे आयोजन करून गावातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्या प्रश्नावर चर्चा करून त्या सोडविण्याचे काम प्रामाणिकपणे करायचे आहे.
लोकांच्या प्रश्नावर वाडी, वस्ती, चावडी, मंदिर व पारावर जाऊन चर्चा करायची. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रमुख भूमिका बजवायला हवी. आपल्या कामामुळेच आपली स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण होणार आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी गावातील छोट्या जाती समूहाचे किमान 10 लोक एकत्र करून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांना घेऊन गावात घरोघरी जा, गावातील प्रश्न व कार्यकर्त्यांची नोंद घ्या. बैठका घ्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून माणसे जोडण्याचे काम करा. आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज व्हा, असा नारा त्यांनी दिला.
यावेळी संतोष ढाकणे, राजू उगलमुगले, संजय मातंग, अजिनाथ आव्हाड, सुनिता जाधव यांची भाषणे झाली. प्यारेलाल शेख यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र निळ यांनी सूत्रसंचालन केले. गणेश भिसे यांनी आभार मानले.
या बैठकीत अध्यक्ष प्यारेलाल शेख, उपाध्यक्ष राजेंद्र नाईक, विशाल इंगळे, सोपानराव काळे, किसनराव पवार, आदिनाथ आव्हाड, विष्णू वीर, विठ्ठल मगर, दिगंबर बल्लाळ, महादेव तुतारे, दगडू गोरुडे, विष्णू वाघमारे, ज्ञानेश्वर म्हस्के, शफीक शेख, पंढरीनाथ कोल्हे, भरत मिसळ, नितीन जाधव, संजय कुर्हाडे, अशोक शिंदे, बाबुराव फुळमाळी, अशोक दिंडे, बबलू दळवी, कैलास चोरमले, ज्ञानेश्वर गिरी, डॉ. अंकुश गायकवाड, दादासाहेब गायके, रवींद्र सर्जे, विश्वास गावडे,
लक्ष्मण ससाणे, गोरख तुपविहिरे, निखिल ससाणे, नामदेव काळे, दिलीप कवडे, रंगनाथ मातंग, महादेव शिंदे, राजेंद्र उगलमुगले, प्रसिध्दी प्रमुख शेख सलीम जिलानी, लक्ष्मण मोरे या नवनियुक्त पदाधिकार्यांचा प्रा. किसन चव्हाण यांच्या हस्ते फेटा बांधून व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
Comments