अकोले । वीरभूमी- 13-Apr, 2022, 03:30 PM
तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक शिखर संस्थेच्या कायम विश्वस्तपदी गिरजाजी जाधव, स्वीकृत विश्वस्तपदी सुरेशराव कोते, मधुकरराव सोनवणे, संपतराव गोविंद वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या आज बुधवारी (दि. 13) झालेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर संस्थेच्या कार्यकारीची निवड देखील करण्यात आली आहे.
संस्थेच्या अध्यक्षपदी गणोर्याचे इंजि. सुनील दातीर, उपाध्यक्षपदी विठ्ठलराव चासकर यांची तर सेक्रेटरीपदी सुधाकरराव देशमुख, सहसेक्रेटरीपदी बाळासाहेब भोर, खजिनदारपदी धनंजय संत यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी दिली.
यावेळी कार्यकारिणी सदस्य म्हणून सुधाकरराव आरोटे, यशवंतराव आभाळे, अॅड. आनंदराव नवले, डॉ. दामोधर सहाणे, शरदराव देशमुख, कचरु पा. शेटे, अशोकराव भांगरे, सौ. कल्पनाताई सुरपुरिया, रमेशराव जगताप, मच्छिंद्र धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली.
विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीसाठी कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड, कायम विश्वस्त सिताराम पा. गायकर व कायम विश्वस्त वैभवराव पिचड उपस्थित होते. निवड झाल्यानंतर सर्व नवनिर्वाचित कायम विश्वस्त, स्वीकृत विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले की, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही तालुक्याची शिखर शैक्षणिक संस्था असून या संस्थेला मोठी परंपरा आहे. या ठिकाणी शिकत असलेले अनेक गरीब आदिवासी विद्यार्थी यांच्यासाठी शैक्षणिक सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे.
त्यादृष्टीने नविन कार्यकारिणीने निर्णय घ्यावेत, अशी सुचना करून शुभेच्छा दिल्या. आभार नुतन सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख यांनी मानले. नूतन पदाधिकार्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Comments