लोहसर येथील भैरवनाथांचा उद्या यात्रोत्सव
लोहसर येथील भैरवनाथांचा उद्या यात्रोत्सव
करंजी । वीरभूमी- 15-Apr, 2022, 12:10 PM
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र लोहसर येथील वैभव संपन्न जागृत श्रीकाळ भैरवनाथाचा यात्रा उत्सव 16 व 17 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सालाबाद प्रमाणे साजरा होणार आहे. भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व लोहसर ग्रामपंचायतीने यात्रेचे नियोजन केले आहे.कोरोना महामारीमुळे सलग तीन वर्षे यात्रा उत्सव झालेला नव्हता. यावर्षीचा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होणार आहे. दि. 16 रोजी सकाळी 9 ते 11 या कालावधीत कावडी मिरवणूक सायं. 4 वाजता शेरण्याची मिरवणूक सायं. 6 ते 10 श्रींचा छबिना मिरवणूक होईल. तसेच दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 9 वा. कलाकारांच्या हजेर्या होतील व दुपारी 3 ते 7 वा. सुप्रसिद्ध कुस्त्यांचा जंगी हगामा होणार आहे. यात्रेचा समारोप माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत होणार आहे.
यात्रा काळातील सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध होणार आहेत. भैरवनाथ मंदिराचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे यावर्षीचा यात्रा उत्सव भव्य दिव्य नवीन मंदिरामध्ये साजरा होत आहे. भैरवनाथ देवस्थान हे पंचक्रोशीतील 25 ते 30 गावाचे आराध्य दैवत आहे.
दिवसेंदिवस भैरवनाथाची महती व भाविकांना प्रचिती येत असल्याने मंदिरात गर्दी वाढत आहे. मागील महिन्यात परिसरातील 700 भाविकांना काशीला नेहून त्या ठिकाणी 10 दिवस मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. असा उपक्रम राबवणारे एकमेव देवस्थान म्हणून भैरवनाथ देवस्थानने नावलौकिक मिळवला आहे.
पंढरपूर येथे दहा गुंठे जागा खरेदी केली असून त्या जागेवर भव्यदिव्य सुसज्ज भैरवनाथ भक्त निवास बांधकाम ट्रस्ट पुढील काही दिवसात हाती घेत आहे. या कामाचा प्रारूप आराखडा तयार असून जवळपास दोन कोटी रुपये यासाठी खर्च केले जाणार आहेत. या भक्तनिवासामुळे लोहसर परिसरातील सर्व गावच्या भक्तांना पंढरपूर या ठिकाणी आषाढ यात्रा वारी व इतर वेळी गेल्यावर राहण्यासाठी हक्काचे ठिकाण होणार आहे.
या संकल्पित वास्तूच्या प्रारूप आराखड्या मधील इमारत चित्र बोर्डचे अनावरण 16 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वा. भैरवनाथ मंदिरात हभप. संतोष शास्त्री गिते (भगवानगड) यांचे शुभहस्ते करण्यात आले. भैरवनाथ मंदिरा समोर 750 किलो वजनाचा 35 फूट उंच शुद्ध पितळी ध्वजस्तंभ उभारणीचे काम देवस्थानने हाती घेतले असून परिसरातील भक्तांनी घरातील जुने पितळी वस्तू देवस्थानला दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात्रा उत्सवात राजकारण विरहित गट तट न करता सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्ट अध्यक्ष अनिल गिते पाटील, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी केले आहे.
यात्रा नियोजनासाठी रावसाहेब वांढेकर , गोरख गिते, राजेंद्र दगडखैर, तुकाराम सानप, महादेव गिते, काशिनाथ खेडकर, सबाजी गिते, भगवान घुले, बाजीराव दगडखैर, शिवाजी दगडखैर, रविंद्र जोशी, शिवाजी सावंत, सीताराम सावंत, विलास टेमकर, छबुराव कापसे, देवेंद्र गिते, रवींद्र रोमन, बाबाजी गिते, महादेव बाठे, किरण गिते, नामदेव वांढेकर, रामदास घोडके, अशोक पाटोळे, ग्रामसेवक कापसे, लोहसर खांडगाव ग्रामपंचायत सदस्य, यात्रा नियोजनात अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
यात्रेत सहभागी होण्याचे सर्वांना आवाहन लोहसरच्या सरपंच हिरा गिते पाटील, उपसरपंच शोभा गिते, खांडगावच्या सरपंच सौ. जगदाळे व देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags :
hSjbIArEOZmRwG