पंजाबमध्ये आम आदमी सरकारची घोषणा
नवी दिल्ली । वीरभूमी- 16-Apr, 2022, 02:22 PM
पंजाब सरकारने 1 जुलै 2022 पासून घरगुती ग्राहकांसाठी 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. याबाबतची माहिती पंजाब माहिती व जनसंपर्क विभागाने दिली आहे.
नवी दिल्लीत आम आदमी पक्षाने सत्ता मिळवल्यानंतर विविध योजना राबवून दिल्लीकरांची मने जिंकली आहेत. त्याचप्रमाणे आता पंजाब राज्यात सत्ता आल्यानंतर तेथेही दिल्ली प्रमाणेच योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमीने भाजपा, काँग्रेसचा पराभव करुन पंजाबमध्ये सरकार स्थापन केले. सत्तेत आल्यानंतर पंजाबमधील नागरिकांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्येक घरात 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जाहीर नाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री मान यांनी मागील महिण्यात पंजाबमध्ये घरोघरी रेशन डिलिव्हरी योजना राबविण्यास प्रारंभ केला आहे.
त्याप्रमाणे 1 जुलै 2022 पासून घरगुती ग्राहकांसाठी 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
Comments