कोपरगाव । वीरभूमी - 17-Apr, 2022, 12:00 PM
गोदावरीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेत मानवाचे जीवन अधिक चांगले कसे होईल याबाबत संशोधन होईल. तसेच या उद्योग समूहाने दुसऱ्यांना त्रास होणार नाही आणि निसर्गाचे रक्षण कसे होईल याची काळजी घेतली असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्याचे उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांनी केले आहे.
तालुक्यातील साकरवाडी येथे गोदावरी बायोरिफायणरीजच्या वतीने स्पेशालिटी केमिकल प्लांट व रिसर्च लॅबोरेटरी चे उदघाटन ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा.सदाशिव लोखंडे, ना.आशुतोष काळे, सोमैय्या ग्रूप चे अध्यक्ष समीर सोमय्या, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, गोदावरी दुधसंघाचे चेअरमन राजेश परजणे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, कार्यकारी संचालक डॉ.संगीता गुप्ता, संचालक सुहास गोडगे, नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना देसाई म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सोमैय्या यांच्या संस्थेने केलेले आहे. सोमैय्या उद्योगसमूह आपल्या उद्योगांमुळे इतर नागरिकांना त्रास होणार नाही व निसर्गाची हानी होणार नाही. याची काळजी नेहमीच घेत आहे. कोरोना काळातही महाराष्ट्रात उद्योगधंदे चालू असल्याने महाराष्ट्र कधीच थांबला नाही,
महाराष्ट्राचे मॉडेल इतर राज्यांनी घेतले आहे. राज्यात येणाऱ्या काळात ३ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून सुमारे ९८ कंपन्यांबरोबर करार केलेले आहे. त्यामुळे देशात महाराष्ट्राचे इलेक्ट्रिक वाहनसंबधीचे धोरण एक नंबर आहे.
खा.लोखंडे यावेळी बोलताना म्हणाले की, पूर्वी सहकारी संस्थांमुळ खाजगी कारखाने बंद पडले परंतु आता सहकारी कारखाने बंद पडत असून खाजकी कारखाने निर्माण होत आहे. तालुक्यात ५० हजार टन ऊस गाळपाचा कारखाना सुरू करावा अशी मागणी सोमैयांकडे त्यांनी केली असता उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
कोपरगाव तालुक्याचे औद्योगिक हब म्हणून ओळख व्हावी यासाठी तालुक्यात परिस्थिती अनुकूल असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. यावर ना. सुभाष देसाई यांनी कोपरगाव तालुक्यात नवीन उद्योग आणण्याबाबत मुंबईत यासंदर्भात बैठक घेऊ सर्व सहकार्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी ऍड. विनायक होन, व्यवस्थापक बी. एम. पालवे, ऍड. चंद्रकांत टेके, ऍड. विद्यासागर शिंदे, मच्छिंद्र टेके, डॉ. प्रीती रावत संचालक, ईंडस ईंड बॅंकेचे झोनल हेड-विकास रंजन, डॉ. गणेश गंडी, डॉ. मोथाली आठवले, नरेश खेतान (Chief Financial Officer), अनिल शर्मा,गणेश पाटील यांचेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
ryzZJMtbgDjaABXI