करंजी सोसायटीवर 'उत्तरेश्वर'चे निर्विवाद वर्चस्व
विरोधकांचा सुपडा साफ : १३ - ० ने विजयी
करंजी । वीरभूमी- 23-Apr, 2022, 06:02 PM
धकांनी मोठा गाजावाजा केलेल्या करंजी सेवा सोसायटी चा निकाल काल लागला या निकालात उत्तरेश्वर सहकारी पॅनल ने सर्वच्या सर्व म्हणजे १३ जागा मोठ्या फरकाने निवडून आणत आपली सत्ता कायम राखली आहे.उत्तरेश्वर सहकार पॅनलची गेली चाळीस वर्ष सत्ता आहे. सहकार अडचणीत आला असतानाही संस्थेने मोठा विकास करत शेतकरी व सभासदांना मोठा दिलासा देण्याचे काम केले. संस्था तालुक्यात नव्हे तर जिल्हयात आदर्श संस्था आहे. संस्थेला कायम ऑडीट वर्ग अ" दर्जा मिळत असतो. सातत्याने सर्वच सभासदाना १५% लाभांश व मध्यम मुदतीच्या कर्जावर २% रिबीट देणारी करंजी ही सहकारातील एकमेव संस्था आहे.
एखादा सभासद मयत झाल्यास सभासदाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणारी तालुक्यात एकमेव संस्था आहे. सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपघातात एखादा अवयव निकामी झाल्यास संस्थेतर्फे सभासदांचा एक लाखाचा विमा मोफत विमा उतरवला जातो.
सभासदांच्या हितासाठी संस्थेच्या मालकीचे किराणा दुकान व स्वस्त धान्य दुकान चालवले जाते. संस्थेने कोणतेही कर्ज न घेता स्व भांडवलातून भव्य दिव्य अशा इमारतीचे बांधकाम केले आहे. सभासदांच्या तथा शेतकऱ्यांच्या हितासाठी दुष्काळातही जनावरांसाठी छावणीची चालू करून चांगली सेवा देणे आदि काम करते. मागील संचालकांनी संस्थेच्या खर्चातून चहाही न पिता स्वतःच्या पैशातून प्रवास व चहा पाणी खर्च करत संस्था आपल्याले लेकरासारखी जपत नावारुपाला आणली.
निवडणुका आल्या की कुत्र्याच्या छत्रीसारखे विरोधक उभे राहतात व सभासद शेतकऱ्यांचे कान भरण्याचे तसेच आर्थिक संभ्रम निर्माण करण्याचे काम करतात. खोटे बोलून लांडगा आला रे आला असे म्हणत स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात.मात्र करंजी सेवा संस्थेचा शेतकरी सभासद सुज्ञ आहे.
विरोधकांना त्यांची जागा दाखवून उत्तरेश्वर सरकार पॅनलला त्यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले असल्याचे विजयी सभेत बाळासाहेब अकोलकर यांनी सांगितले. या निवडणुकीत सरपंच बाळासाहेब आकोलकर ॲड . मिर्झाजी मणियार , शरद आकोलकर , विजय अकोलकर , सुनील साखरे, नवनाथ आरोळे, सुभाष आकोलकर आदींनी मोठे योगदान दिले. सभासद शेतकरी यांनी निवडणुकीत उत्स्फूर्तपणे त्यांनी मतदारांना केले व उत्तरेश्वर सहकार पॅनलला विजयी केले. विजयी उमेदवारांचे तसेच सर्व सभासद शेतकऱ्यांचे सरपंच बाळासाहेब आकोलकर यांनी आभार मानले.
विजयी उमेदवार =संतोष आकोलकर ( ४८३ )मतदान आसाराम आकोलकर (४७९), बाळासाहेब आकोलकर (४६९ ), देविदास साखळकर ( ४६७), संभाजी अकोलकर (४६०) महादेव नजर (४५३), बाळासाहेब मोरे (४३९), सुमन अकोलकर ( ५१० ), द्वारकाबाई हरिभाऊ अकोलकर ( ४७५), झुंबर शिरसागर (५१८), लक्ष्मण भिडे (४८४), वसंत क्षेत्रे ( ५०६ ) आदी उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एम कराळे यांनी काम पाहिले.
पी. के.ची रणनिती व दणदणीत 'विजय '
करंजी सेवा सोसायटी निवडणुकीतील करंजीचे रणनीती कार प्रशांत किशोर उर्फ विजय अकोलकर यांच्या रणनीतीने विरोधी गटाचा धुव्वा उडाला. सुरुवातीला थोडा सय्यम दाखवत व नंतर आक्रमक प्रचार करत प्रत्येक मतदाराला समजाउन सांगत तसेच कोणत्या मतदाराची नाडी कोठे आहे हे त्या पद्धतीने व्युहरचना विजय अकोलकर यांनी करून मोठ्या फरकाने सहज विजय मिळवत सेवा संस्था आपल्या ताब्यात ठेवली.
Comments