तिसगाव । वीरभूमी- 29-Apr, 2022, 06:02 PM
भारत सरकारच्या पंडीत मदन मोहन मालवीया नॅशनल मिशन ऑन टीचर्स अॅण्ड टिचींग या योजनेअंतर्गत आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि श्रीगुरु तेज बहादूर खालसा महाविद्यालय, दिल्ली विद्यापीठ यांचे गुरु अंगददेव टिचिंग लर्निग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रिसेंट ट्रेंड्स इन टिचिंग लर्निंग प्रोसेस या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन ‘फॅकल्टी डेव्हलपमेंन्ट प्रोग्रॅम’चे आयोजन करण्यात आले होते.
सदरील प्रोग्रॅममध्ये दिल्ली, हरियाना, केरळ, गोवा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड व महाराष्ट्र अशा विविध राज्यातुन 198 प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. सात दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवर संसाधन व्यक्ती म्हणुन लाभले.
यामध्ये पहिल्या दिवशी गुरु अंगददेव टीचिंग लर्निग सेंटरचे अध्यक्ष व पी. डी. एम. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ए. के बक्षी यांनी लर्नर सेंट्रीक एज्युकेशन फॉर 21 सेंच्युरी लर्निंग नीड यावर व्याख्यान दिले. गुरु अंगददेव टिचिंग लर्निग सेंटरच्या प्रोजेक्ट हेड प्रा. विमल रहा यांनी मेथोडोलॉजी ऑफ कन्टेन्ट डेव्हलपमेंट फोर कॉड्रन्ट मॉड्यूल, प्रा. पीयूष पहाडे यांनी एक्सपिरीयन्शीयल लर्निंग, प्रा. श्रीहरी पिंगळे यांनी ऍडव्हान्स लर्नर अँड स्लो लर्नर, डॉ. एम.एल. डोंगरे यांनी गिअर अप रिसर्च टीट्युड, डॉ. रुपेश थोपटे यांनी टेक्निक्स ऑफ योगा, डॉ. श्रीशा गिजारे यांनी न्यूट्रिशन फॉर टीचर, डॉ. दीपक ननावरे यांनी अटेनमेंन्ट ऑफ कोर्स आऊटकम्स, प्राचार्य डॉ. एस. एल. लावरे (सोनई) यांनी पेटंट रजिस्ट्रेशन, प्राचार्य डॉ. संजय चाकणे (इंदापूर, पुणे) यांनी रोल ऑफ टिचर इन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी व प्राचार्य डॉ. बी. वाय. देशमुख (राजुर, अकोले.) यांनी फीचर्स ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या विषयांवर व्याख्याने दिली.
समारोपाच्या प्रसंगी श्री गुरू तेज बहादुर खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जसविंदर सिंग, गुरु अंगददेव टिचिंग लर्निग सेंटरचे अध्यक्ष व पी. डी. एम. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ए. के. बक्षी, गुरु अंगददेव टिचिंग लर्निग सेंटरच्या प्रोजेक्ट हेड प्रा.डॉ. विमल रहा तसेच दादापाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर, आय. क्यू. ए. सी. समंन्वयक प्रा. राजु घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. डॉ. ए. के. बक्षी यांनी प्राध्यापकांशी संवाद साधताना ते म्हणाले, प्राध्यापकांनी विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणातील नवीन ट्रेंडचा वापर आपल्या अध्यापनात केला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
या वेळी प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर गायकवाड यांनी केले तर रोहित आदलिंग यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर व कार्यालयीन अधीक्षक विक्रमराव राजळे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. अतुलकुमार चौरपगार, डॉ. ज्ञानदेव कांडेकर, प्रा. आसाराम देसाई, प्रा. चंद्रकांत पानसरे, प्रा. योगीता इंगळे व गुरु अंगददेव टिचिंग लर्निग सेंटरच्या प्रा. हिमांशी त्यागी यांनी विशेष परीश्रम घेतले.
rGnRaWptDzkMF