पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजेंची मोठी घोषणा
पुणे । वीरभूमी- 12-May, 2022, 02:24 PM
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज यांच्या विचारांना माननार्या समाजातील सर्व जातीधर्माच्या लोकांना संघटित करून त्यांना एका छत्राखाली आणण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापन करत असल्याची घोषणा खा. संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
‘स्वराज्य’ संघटनेच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करुन दिशा देण्याचे काम केले जाणार आहे. गोर-गरिब जनतेच्या कल्याणासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.
काही दिवसापूर्वी राज्यभर केलेल्या दौर्या सरम्यान गेल्या 20 वर्षाच्या काळापासून शेतकरी, विद्यार्थी, गोर-गरिब यांचे अनेक प्रश्न समोर आले. ते प्रश्न सोडविण्यासाठी काही निर्णय घेतले, यामुळे मला लोकांचे प्रेम मिळाले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेची खासदारकी दिली. त्या पदाची गरिमा कायम राखत गडकोट किल्ल्यांचे रायगड प्राधिकरणाचे जे काम सुरु आहे ते संपूर्ण देशात कसे सुरु होईल हे पाहिले.
मुंबईत 2017 साली मराठा समाजाचा मोर्चा निघाला होता. त्यावेळी स्टेजवर जावून समाजाला शांत करण्याचे काम केले. यावेळी महाविकास आघाडीची बाजू घेतली. यामुळे भाजपला वाटलं असेल की, विरोधाची भूमिका घेत आहे. मात्र मी वेळोवेळी समाजाच्या बाजुनेच भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माझ्या खासदारकीचा सहा वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र समाजासाठी जे काम करावयाचे आहे ते अजून बाकी आहे. यासाठी कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष राज्यसभेची खासदारकीची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली.
माझी कार्यपद्धती ही राजकारण विरहीत असून समाजाला दिशा देणारी आहे. यामुळे राज्यातील अपक्ष आमदारांनी मला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
zMbNyiPDQfUuV