शेवगाव । वीरभूमी- 15-May, 2022, 06:14 PM
शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथील बाळासाहेब माधव आव्हाड व निंबेनांदुर येथील शेषराव तात्याबा बुधवंत या दोन शेतकर्यांना एका एजंटने ‘तुमच्या मुलांना नोकरीला लावतो’ म्हणून आठ महीन्यापुर्वी तीन लाख रुपये घेत फसवणूक केली. या दोघा शेतकर्यांकडून पैसे घेतले मात्र मुलांना नोकरीला लावून दिले नाही आणि पैसेही परत केले नाहीत.
ती व्यक्ती पैसेही देत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने त्यांनी याबाबत वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांची भेट घेवून आपली फसवणूक झाल्याबाबत पुर्ण माहीती दिली. यावर क्षणाचाही विलंब न करता आपल्या वंचितच्या स्टाईलने त्या फसवणूक करणार्या व्यक्तीला फोन केला.
यावर प्रा. चव्हाण त्या व्यक्तीला म्हणाले की, मुलांना नोकरीला लावण्याच्या बहाण्याने गरीब कुटुंबातील शेतकर्यांकडून घेतलेले पैसे त्वरित द्या, अन्यथा आम्ही वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी पिडीत शेतकर्यांच्या कुटुंबासमवेत तुमच्या घरासमोर बेमुदत ठिय्या मांडून बसू. तुमच्यावर नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याबाबत गुन्हा ही नोंदवू, असा इशारा दिला.
प्रा. किसन चव्हाण यांच्या इशार्यानंतर एक आठवड्यातच त्या फसवणूक करणार्या व्यक्तीने पिडीत शेतकर्यांचे पैसे परत केले. याबाबत पिडीत शेतकरी बाळासाहेब आव्हाड व शेषराव बुधवंत यांच्या कुटुंबाने प्रा. किसन चव्हाण व वंचित बहूजन आघाड़ीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनःपुर्वक आभार व्यक्त केले.
याबाबत प्रा. किसन चव्हाण सर म्हणाले की, सुशिक्षित तरूणांनी अशा फसवून करणार्या एजंट लोकांच्या बोलबच्चन मध्ये येवून फसू नये, कारण आपल्या बुद्धीच्या जोरावर अभ्यास करून मेहनत करून सरकारी नोकर्या मिळवा. छोटे मोठे उद्योग सुरू करून आपल्या पायावर उभे राहा. फसवणूक करणारे मोठे रॅकेट असून अजूनही अनेक तक्रारी आपल्याकडे येत आहे. भविष्यात या रॅकेटचा आपण पर्दाफाश करू. फसवणूक झालेल्या शेतकर्यांनी संपर्क साधावा फसवणूक झालेल्यांनी धीर धरावा कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. त्यांना सर्वतोपरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मदत केली जाईल.
या प्रसंगी वंचित बहूजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, सोपान आव्हाड, सुखदेव गायकवाड, विनोद बुधवंत, लक्ष्मण मोरे, रवींद्र सर्जे, शेख सलीम, राजूभाऊ नाईक, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर सामाजिक, वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
Comments