पाथर्डीतील कर्जदाराला 7 लाखांचा दंड, 4 महिने सश्रम कारावास
अहमदनगर । वीरभूमी - 27-May, 2022, 12:59 PM
कर्ज फेडण्यासाठी श्री. व्यंकटेश मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट.सोसा. लि. अहमदनगर, शाखा पाथर्डी या शाखेला दिलेला 5 लाख 76 हजार 38 रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालय क्र. 10 अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. आर दंडे साहेब यांनी 7 लाख रूपयांचा दंड व चार महिन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
दंड न भरल्यास आरोपीस चार महिन्याचा सश्रम कारावास शिक्षा सुनावली आहे. सीताराम कुंडलिक शिंदे (रा. आदर्श स्कूल जवळ, जुना खर्डा रोड, पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या कर्जदाराचे नाव आहे.
सीताराम कुंडलिक शिंदे यांनी श्री. व्यंकटेश मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट. सोसा. लि. पाथर्डी शाखेतुन दि. 13/01/2016 रोजी रक्कम 5 लाख रुपयांचे कर्ज व्यवसाय वाढीसाठी घेतले होते. कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जदार यांनी श्री. व्यंकटेश मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट लि. यांना 5 लाख 76 हजार 38 रूपयांचा स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा पाथर्डी, जि अहमदनगर चा धनादेश दिला होता.
हा धनादेश श्री. व्यंकटेश मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसा लि. यांनी त्यांचे खाते असलेल्या बँकेत भरला असता तो वटला नाही, त्यामुळे श्री.व्यंकटेश मल्टीस्टेट ऑप. क्रेडीट सोसा. लि. यांनी कर्जदार यांना वेळोवेळी लेखी व तोंडी पैसे भरण्यास सांगुन देखील कर्जदार सीताराम कुंडलिक शिंदे यांनी पैसे भरले नाहीत.
त्यामुळे श्री. व्यंकटेश मल्टीस्टेट यांनी वकिला मार्फत कर्जदार यांना नोटीस पाठवली, परंतु कर्जदार यांनी नोटीसीला प्रतिसाद दिला नाही. म्हणुन श्री. व्यंकटेश मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसा. लि. यांनी कर्जदाराविरूद्ध अहमदनगर येथील न्यायालयात केस दाखल केली.
सदर केसवर सुनावणी झाली असता मंगेश देहेडकर यांनी पुरावे सादर केले. व फिर्यादी संस्थेतर्फे अॅड. एस. के. खंडीझोड, अॅड. के. ए. जाधव व संस्थेचे कर्मचारी विशाल गोरे यांनी काम पाहीले. त्यांना अॅड. एस. आर. सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
सुनावणी अंती अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. आर. दंडे साहेब यांनी वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.
ynmWxYAvMHwciJGF