श्रीगोंदा तालुक्यातील घटना
श्रीगोंदा । वीरभूमी - 27-May, 2022, 01:03 PM
श्रीगोंदा तालुक्यातील नगर-श्रीगोंदा रस्त्यावरील पारगाव सुद्रीक येथील संजय सुखदेव धनवडे या शेतकर्याच्या अज्ञात चोरट्यांनी तब्बल 18 शेळ्या बुधवार दि. 25 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शेळी पालनाच्या शेडमधून चोरून नेल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पारगाव सुद्रीक (ता. श्रीगोंदा) येथील बसस्थानकाजवळ संजय सुखदेव धनवडे यांच्या राहत्या घराजवळ शेळी पालनाचा व्यवसाय आहे.
बुधवार दि.25 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेड मधून सुमारे 52 हजार 200 रुपयांच्या 18 शेळ्या चोरून नेल्या आहेत. शेड मधील 5 शेळ्या व एक 120 किलोचा बोकड मात्र बचावला.
याबाबत संजय धनवडे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रोहिदास झुंजार अधिक तपास करत आहेत.
Comments