पाथर्डी । वीरभूमी - 27-May, 2022, 01:05 PM
शहरातील इंदिरा गांधी चौक ते चिंचपूर रोड हा रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी या भागातील रहीवाशांच्या वतीने पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात परवेज़ पठाण, जुनेद पठाण, रेखा आंधळे, मुकुंद गर्जे, अंजुम बेग, बब्बु सय्यद, इस्ताक पठाण, नदिम शेख, बब्बु शेख, शाहरुख शेख, सुनील गोसावी, किशोर डांगे, अरबाज पठाण, युनुस शेख, अस्लम शेख, उजेर आतार, अरमान पिंजारी, फारुख पिंजारी, सलीम शेख, राजु शेख, शोएब शेख आदींनी सहभाग घेतला.
या आंदोलनास माजी नगरसेवक रामनाथ बंग व दिपाली बंग यांनीही पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी आंदोलकांनी पालिका मुख्याधिकारी महेश लांडगे यांच्याशी चर्चा करत लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.
याविषयी बोलताना जुनेद पठाण यांनी सांगितले की, पाथर्डी शहरातील मध्यवर्ती भागातील या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सर्व ठिकाणचे पेव्हिंग ब्लॉक उखडले आहे. चालताना नागरिकांच्या अंगावर गटारीचे पाणी उडते. या रस्त्यावर पसरलेल्या दुर्गंधीमुळे आरोग्याची व्यवस्था बिकट असून साथीचे रोग पसरत आहेत. या ठिकाणी राहणे ही मोठे मुश्किल झाले आहे. वारंवार पालिका प्रशासनाला लेखी तोंडी निवेदन देऊन देखील हा रस्ता दुरुस्त झाला नाही म्हणून आज आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
पालिका प्रशासनाने आम्हाला आठ दिवसांत प्रश्न मार्गी लावु. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एनओसी मिळवून या रस्त्याची दुरुस्ती करून देऊ असे आश्वासन दिले आहे. ते पालिका प्रशासनाने न पाळल्यास त्यानंतर मात्र या पेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा यावेळी उपस्थित आंदोलकांनी व नागरिकांनी व्यक्त केला.
या आंदोलनप्रसंगी पालिका अधिकारी व आंदोलकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
rfvsIFhxGdyjqz