अहमदनगर । वीरभूमी - 28-May, 2022, 05:47 PM
खरीप हंगामपूर्व तयारीला लागलेला शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र लवकरच पावसाची प्रतिक्षा संपणार असून राज्यात ठिकठिकाणी 1 जून पासून पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
शेतकर्यांची खरोप हंगामपूर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे होरपळून निघालेल्या जनतेसह शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. आज हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी अंदाज वर्तविला असून 1 जून पासून पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला आहे.
हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी म्हटले आहे की, राज्यात दि. 1, 2, 3, 4 जून दरम्यान दररोज भाग बदलत पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. हा पाऊस कोल्हापूर, सातारा, सागंली, पूणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, वैजापूर याठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे. तर दि. 7, 8, 9 जून दरम्यान राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.
हा पाऊस लागवडीयोग्य असणार असून पेरणीला सुरुवात होईल. असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
तसेच हा अंदाज लक्षात घेऊन शेतकर्यांनी शेतीचे नियोजन करावे, असे आवाहनही पंजाब डख यांनी केले आहे.
Hii