अहमदनगर । वीरभूमी- 02-Jun, 2022, 06:22 PM
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. कोपरगाव तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत. यामुळे जुन्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये मोठी तोडफोड झाली आहे.
प्रारुप गट व गण रचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यात आता 6 जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा वाढल्याने याचा कोणाला फायदा व तोटा होईल हे येणारा काळच ठरवणार आहे.
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे- 1) सुरेगाव गट (सुरेगाव गण)- सुरेगाव, सांगवी भुसार, मळेगावथडी, वेळापूर. (धामोरी गण)- धामोरी, मोर्वीस, चासनळी, मंजूर, मायगावदेवी, वडगाव, बक्तरपूर, हंडेवाडी, कारवाडी.
2) शिंगणापूर गट (शिंगणापूर गण)- शिंगणापूर, खिर्डी गणेश, येसगाव, टाकळी. (ब्राम्हणगाव गण)- ब्राम्हणगाव, रवंदे, सोनारी, धारणगाव, नाटेगाव.
3) करंजी बु. गट (करंजी बु. गण)- करंजी बु., ओगदी, बोलकी, आपेगाव, पढेगाव, शिरसगाव (सावळगाव), उक्कडगाव, तिळवणी, आंचलगाव, कासली. (दहेगाव बोलका)- दहेगाव बोलका, गोधेगाव, घोयेगाव, तळेगाव मळे, लौकी, धोत्रे, भोजडे, खोपडी, कान्हेगाव.
4) संवत्सर गट (संवत्सर गण)- संवत्सर, सडे, वारी. (कोकमठाण गण)- कोकमठाण, जेऊर पाटोदा, मुर्शदपूर.
5) पोहेगाव बु. गट (पोहेगाव बु. गण)- पोहेगाव बु. (पोहेगाव खुर्द), देर्डेचांदवड, घारी, डाऊस बु., डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी. (कोळपेवाडी गण)- कोळपेवाडी, माहेगाव देशमुख, कुंभारी, कोळगाव थडी, हिंगणी, चांदगव्हाण, शहाजापूर.
6) चांदेकसारे गट (चांदेकसारे गण)- चांदेकसारे, शहापूर, मढी बु., मढी खुर्द, देर्डे कोर्हाळे, सोनेवाडी. (रांजणगाव देशमुख गण)- रांजणगाव देशमुख, मनेगाव, काकडी (मल्हारवाडी), धांडेवाडी, वेस (सोयेगाव), अंजनापूर, जवळके, बहादराबाद, बहादरपूर.
TzkARPGWlguDFOZ