अहमदनगर । वीरभूमी- 02-Jun, 2022, 06:30 PM
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. राहाता तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत. यामुळे जुन्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये मोठी तोडफोड झाली आहे.
प्रारुप गट व गण रचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.
राहाता तालुक्यात आता 6 जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा वाढल्याने याचा कोणाला फायदा व तोटा होईल हे येणारा काळच ठरवणार आहे.
राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे- 1) पुणतांबा गट (पुणतांबा गण)- पुणतांबा (रस्तापुर), पिंपळवाडी, न. पा. वाडी, रामपुरवाडी. (सावळीविहीर बु. गण)- सावळीविहीर बु., सावळीविहीर खुर्द, रुई, शिंगवे.
2) वाकडी गट (वाकडी गण)- वाकडी (संभाजीनगर), चितळी, जळगाव (एलमवाडी), धनगरवाडी. (अस्तगाव गण)- अस्तगाव (चोळकेवाडी, मोरवाडी, तरसवाडी), एकरुखे, रांजणगाव खुर्द.
3) साकुरी गट (साकुरी गण)- साकुरी, पिंपळस, कोर्हाळे. (निमगाव कोर्हाळे गण)- दहिगाव कोर्हाळे, वाळकी, डोर्हाळे, कनकुरी, नांदुर्खी बु., नांदुर्खी खुर्द, निमगाव कोर्हाळे, निघोज.
4) बाभळेश्वर बु. गट (बाभळेश्वर बु. गण)- बाभळेश्वर खुर्द (बाभळेश्वर बु.), राजुरी, नांदुर बु., रांजणखोल. (पिंपरी निर्मळ गण)- पिंपरी निर्मळ, केलवड बु. (केलवड खुर्द), पिंपरी लोकाई, आडगाव बु., आडगाव खुर्द, खडकेवाके, गोगलगाव.
5) लोणी खुर्द गट (लोणी खुर्द गण)- लोणी खुर्द, चंद्रापूर. (लोणी बु. गण)- लोणी बु., लोहगाव, हसनापूर.
6) कोल्हार बु. गट (कोल्हार बु. गण)- कोल्हार बु., तिसगाव, ममदापूर. (दाढ बु. गण)- दाढ बु., भगवतीपुर, पाथरे बु., हणमतंगाव, दुर्गापूर.
tFgRYdlozELe