अहमदनगर । वीरभूमी- 02-Jun, 2022, 06:37 PM
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. श्रीरामपूर तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत. यामुळे जुन्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये मोठी तोडफोड झाली आहे.
प्रारुप गट व गण रचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.
श्रीरामपूर तालुक्यात आता 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा वाढल्याने याचा कोणाला फायदा व तोटा होईल हे येणारा काळच ठरवणार आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे- 1) उंदिरगाव गट (उंदिरगाव गण)- उंदीरगाव, माळवडगाव, हरेगाव, महाकाळवडगाव. (निमगाव खैरी गण)- निमगाव खैरी, गोंडेगाव, मातुलठाण, नायगाव, जाफराबाद, रामपूर, नाऊर, सराला, माळेवाडी, गोवर्धनपूर.
2) टाकळीभान गट (टाकळीभान गण)- खानापूर, भामाठाण, कमालपूर, मुठेवडगाव, घुमनदेव, टाकळीभान. (शिरसगाव गण)- भोकर, वडाळा महादेव, शिरसगाव.
3) दत्तनगर गट ( दत्तनगर गण)- ब्राम्हणगाव वेताळ, भैरवनाथ नगर, दिघी, खंडाळा, दत्तनगर. (उक्कलगाव गण)- उक्कलगाव, कडीत बु. (कडीत खुर्द), मांडवे, फत्याबाद, कुरणपुर, एकलहरे, गळनिंब.
4) बेलापूर बुद्रुक गट (बेलापूर बु. गण)- बेलापूर बु. (ऐनतपूर), बेलापूर खुर्द (नर्सरी). (पढेगाव गण)- पढेगाव, मातापूर, वळदगाव, लाडगाव, कान्हेगाव, उंबरगाव.
5) निपाणी वडगाव गट (निपाणी वडगाव गण)- खोकर, निपाणी वडगाव (कारेगाव गण)- कारेगाव, मालुंजा बु., भेर्डापूर, वांगी बु. वांगी खुर्द, गुजरवाडी, खिर्डी.
Comments