अहमदनगर । वीरभूमी- 02-Jun, 2022, 06:47 PM
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. नेवासा तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत. यामुळे जुन्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये मोठी तोडफोड झाली आहे.
प्रारुप गट व गण रचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.
नेवासा तालुक्यात आता 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा वाढल्याने याचा कोणाला फायदा व तोटा होईल हे येणारा काळच ठरवणार आहे.
नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे- 1) बेलपिंळगाव गट (बेलपिंळगाव गण)- घोगरगाव, बेलपिंळगाव, जैनपुर, बेलपांढरी, सुरेगाव गंगापूर (बोरगाव), उस्थळ खालसा, भालगाव, गोधेगाव, बहिरवाडी (धामोरी), टोका (वाशिम). (प्रवरासंगम गण)- मुरमे (मडकी, खलाल पिंप्री), बकुपिंपळगाव, प्रवरासंगम (माळेवाडी खालसा, म्हाळापूर), खेडले काजळे, मंगळापूर, गळनिंब, गोगलगाव, शिरसगाव, वरखेड (माळेवाडी दुमाला, सुरेगाव तर्फे दहिगाव).
2) सलाबतपुर गट (सलाबतपुर गण)- गिडेगाव, गेवराई, नजिक चिंचोली, दिघी, सलाबतपूर, जळके बु., जळके खुर्द. (खामगाव गण)- रामडोह, गोपाळपूर, खामगाव, वाकडी, पिंप्री शहाली (गोयगव्हाण), पाथरवाले, सुकळी बु. (सुकळी खुर्द), नांदुर शिकारी, वडुले.
3) भेंडा बुद्रुक गट (भेंडा बु. गण)- भेंडा बु., भेंडा खुर्द, सौंदाळा, देवगाव, नागापूर, रांजणगाव. (कुकाणा गण)- तरवडी, अंतरवली, चिलेखनवाडी, देवसडे, जेऊर हैबती, कुकाणा.
4) भानसहिवरे गट (भानसहिवरे गण)- मुकिंदपुर, हंडिनिमगाव, सुरेशनगर, भानसहिवरे, कारेगाव, माळी चिंचोरा, उस्थळ दुमाला (बाभुळवढे), नवीन चांदगाव, निपाणी निमगाव, नारायणवाडी (धनगरवाडी). (मुकिंदपूर गण)- गोंडेगाव (म्हसले), बाभुळखेडे, पिचडगाव, खुणेगाव, मक्तापूर, खडका.
5) पाचेगाव गट (पाचेगाव गण)- नेवासा बु., लेकुरवाळी आखाडा, जायगुडे आखाडा, चिंचबन, खुपटी, गोणेगाव, गोमाळवाडी, पुनतगाव, पाचेगाव. (करजगाव गण)- निंभारी, अंमळनेर, वाटापूर, करजगाव, पानेगाव, शिरेगाव, खेडले परमानंद, बेल्हेकरवाडी.
6) शिंगणापूर गट (शिंगणापूर गण)- शिंगणापूर, हिंगोणी, कांगोणी, बर्हाणपूर, रस्तापूर, म्हाळस पिंळगाव, फत्तेपुर. (खरवंडी गण)- लांडेवाडी, गणेशवाडी, खरवंडी, तामसवाडी, वडाळा बहिरोबा.
7) सोनई गट (सोनई गण)- सोनई, वंजारवाडी. (घोडेगाव गण)- धनगरवाडी, मोरया चिंचारे, लोहगाव, पानसवाडी, घोडेगाव, झापवाडी.
8) चांदा गट (चांदा गण)- वांजोळी, शिंगवे तुकाई, राजेगाव, मांडेगव्हाण (मोरगव्हाण), लोहारवाडी, चांदा, कौठा. (देडगाव गण)- महालक्ष्मी हिवरे, माका, पाचुंदा, शहापुर, देडगाव, तेलकुडगाव.
Comments