अहमदनगर । वीरभूमी- 02-Jun, 2022, 06:55 PM
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. शेवगाव तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत. यामुळे जुन्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये मोठी तोडफोड झाली आहे.
प्रारुप गट व गण रचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.
शेवगाव तालुक्यात आता 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा वाढल्याने याचा कोणाला फायदा व तोटा होईल हे येणारा काळच ठरवणार आहे.
शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे- 1) दगिावने गट (दहिगावने गण)- दहिगाव ने (घेवरी, देवळाणे), विजयपुर, रांजणी, सुलतानपूर बु., शहरटाकळी, ढोरसडे (आंत्रे), भावीनिमगाव. (एरंडगाव गण)- एरंडगाव, लाखेफळ, बोडखे, ताजनापूर, दादेगाव, खुंटेफळ, दहिफळ जुने, कर्जत खुर्द, ढोरहिंगणी, तळणी, घोटण (आंतरवाली खु. ने), खानापूर, कर्हेटाकळी.
2) मुगी गट (चापडगाव गण)- नजिक बाभुळगाव, कुरुडगाव (रावतळे), गदेवाडी, दहिगाव शे, खडके, मडके, राक्षी, चापडगाव, प्रभुवाडगाव, लखमापुरी, खामपिंप्री. (मुंगी गण)- मुंगी, पिंगेवाडी, सोनविहीर, हातगाव, कांबी.
3) बोधेगाव गट (बोधेगाव गण)- बोधेगाव, बालमटाकळी, गायकवाड जळगाव, सुकळी, शेकटे बु., ठाकुर पिंळगाव. (लाडजळगाव गण)- लाडजळगाव (बाडगव्हाण, मुरमी), शिंगोरी, दिवटे, अधोडी (शोभानगर), शेकटे खुर्द, चेडेचांदगाव (सुळे पिंपळगाव), राणेगाव, गोळेगाव, कोनोशी, नागलवाडी (सेवानगर लमाणतांडा).
4) भातकुडगाव गट (भातकुडगाव गण)- भातकुडगाव, देवटाकळी, हिंगणगाव ने, खामगाव, बक्तरपूर, जोहरापूर, भायगाव, लोळेगाव, मजलेशहर, बडुले बुद्रुक. (वाघोली गण)- वाघोली, वडुले खुर्द, निंबे (नांदुर विहीरे), ढोरजळगाव शे (आपेगाव, मलकापूर, गरडवाडी), ढोरजळगाव ने, मळेगाव, सामनगाव, आखतवाडे.
5) अमरापूर गट (अमरापूर गण)- अमरापूर, बर्हाणपुर, आव्हाण खुर्द (शहापूर), आव्हाणे बु., सुलतानपूर (शहाजापूर), भगुर, वरुर बु. (वरुर खुर्द), खरडगाव, सालवडगाव. (आखेगाव गण)- आखेगाव तीतर्फा (आखेगाव डोंगर), ठाकुर निमगाव, वाडगाव (मुर्शतपूर), सोनेसांगवी, वरखेड, हसनापूर, कोळगाव, मंगरुळ बु., मंगरुळ खुर्द, अंतरवाली बु., अंतरवाली खुर्द शे, बेलगाव, माळेगाव ने, थाटे.
Comments