अहमदनगर । वीरभूमी- 02-Jun, 2022, 07:03 PM
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. पाथर्डी तालुक्यात 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गण आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा जैसे थेच असल्याने इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या प्रारुप गट व गण रचनेवर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.
पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे-
1) कासार पिंपळगाव गट (कासार पिंपळगाव गण)- कासार पिंपळगाव, पाडळी, डांगेवाडी, चितळी, सुसरे, सोमठाणे न. (सोमठाणे बु.), साकेगाव (काळेगाव फ.), सांगवी बु. (सांगवी खुर्द, माळेगाव), खेर्डे, ढवळेवाडी. (कोरडगाव गण)- कोरडगाव, औरंगपूर, पागोरी पिंपळगाव (प्रभुपिंप्री), जिरेवाडी, निपाणी जळगाव (वसु), सोनोशी, तोंडोळी, कोळसांगवी, कळसपिंप्री, दुलेचांदगाव, वाळुंज, आगसखांड.
2) भालगाव गट (भालगाव गण)- भालगाव (कासाळवाडी), खरवंडी कासार, मुंगुसवाडे, मालेवाडी, एकनाथवाडी, मिडसांगवी (भवरवाडी), जवळवाडी, ढाकणवाडी, भारजवाडी. (अकोला गण)- अकोला (पालवेवाडी, धायतडकवाडी), शेकटे, मोहोज देवढे (हाकेवाडी, काळेवाडी, रुपनरवाडी), भुतेटाकळी, नांदुर निंबादैत्य, कारेगाव, येळी (बडेवाडी, बोंदरवाडी), पिंपळगव्हाण, जांभळी.
3) माळी बाभुळगाव गट (माळी बाभुळगाव गण)- माळी बाभुळगाव, हत्राळ, सैदापूर, मढी, घाटशिरस, शिरापूर (करडवाडी), निवडुंगे, रांजणी, धामणगाव, केळवंडी. (तिसगाव गण)- तिसगाव, सोमठाणे खु., मोहोज खुर्द, कडगाव, राघोहिवरे, खांडगाव (जोहरवाडी), कौडगाव आठरे (निंबोडी, त्रिभुवनवाडी), मांडवे, देवराई, पारेवाडी.
4) मिरी गट (मिरी गण)- मिरी, रणुकाईवाडी, शंकरवाडी, आडगाव, जवखेडे दुमाला, जवखेडे खा. (कासारवाडी), हनुमान टाकळी, कामत शिंगवे, कोपरे, केशव शिंगवे. (करंजी गण)- करंजी, डोंगरवाडी, डमाळवाडी, लोहसर, शिराळ, चिचोंडी, गितेवाडी, दगडवाडी, धारवाडी, वैजुबाभुळगाव, भोसे, कोल्हार, सातवड.
5) टाकळी मानूर गट (टाकळी मानूर गण)- टाकळी मानूर (चुंभळी), अंबिकानगर, चिंचपूर पांगुळ (मानेवाडी), चिंचपूर इजदे (कुत्तरवाडी), भिलवडे, पिंपळगाव टप्पा, तिनखडी, जोगेवाडी, वडगाव (ढाकणवाडी), करोडी. (माणिकदौंडी गण)- माणिकदौंडी, पत्र्याचा तांडा, मोहरी, घुमटवाडी, लांडकवाडी, पिरेवाडी (डमाळवाडी), शिरसाठवाडी, चितळवाडी, आल्हणवाडी, जाटदेवळे (शिंदेवाडी), बोरसेवाडी, धनगरवाडी (चेकेवाडी), मोहटे.
jAEOmueMXQK